AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंड क्रिकेट टीमच्या ‘त्या’ Video वरून गोंधळ! बेन स्टोक्स फिरकी घेत म्हणाला काढून टाका

इंग्लंड आणि न्यूझीलंड कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बेन स्टोक्सने निवृत्ती जाहीर केली. दुसऱ्या कसोटी त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. पण तिसरा कसोटी सामना सुरू असताना त्याने निवृत्ती जाहीर केली. या दरम्यान इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर आता आयसीसीने आक्षेप घेतला आहे.

इंग्लंड क्रिकेट टीमच्या 'त्या' Video वरून गोंधळ! बेन स्टोक्स फिरकी घेत म्हणाला काढून टाका
इंग्लंड क्रिकेट टीमच्या 'त्या' Video वरून गोंधळ! बेन स्टोक्स फिरकी घेत म्हणाला काढून टाकाImage Credit source: TV9 Network
| Updated on: Jul 09, 2026 | 6:09 PM
Share

इंग्लंड क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी गेल्या काही मनाविरुद्ध झाल्या आहे. नुकताच देशात वुमन्स टी20 वर्ल्डकप पार पडला. पण यातही पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्याआधी न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 1-2 ने गमवावी लागली होती. पहिला कसोटी सामना जिंकूनही शेवटच्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता टी20 मालिकेत इंग्लंडचा संघ चांगली कामगिरी करत आहे. सलग दोन सामने जिंकून टीम इंडियावर भारी पडला आहे. असं असताना एका व्हिडीओवरून वादाला फोडणी मिळाली आहे. या व्हिडीओत बेन स्टोक्सने निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र हा व्हिडीओता इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अंगलट आला आहे. आयसीसीने त्या व्हिडीओवर आक्षेप घेतला आहे. नेमकं काय झालं ते समजून घेऊयात..

बेन स्टोक्सचा निवृत्तीचा व्हिडीओ चर्चेत

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना नॉटिंघमध्ये सुरू होता. या शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसा आधी बेन स्टोक्सच्या निवृत्तीची बातमी समोर आली. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ इंग्लंड क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममधला होता. हा व्हिडीओ चौथा दिवसाचा खेळ सुरू होण्याआधीचा होता. त्यात बेन स्टोक्स संपूर्ण संघाला निवृत्तीच्या निर्णयाबाबत सांगत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर आता आयसीसीला हा व्हिडीओ खटकला आहे.

आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन

आयसीसीने या व्हिडीओवर आक्षेप घेत इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधला आहे. आयसीसीने या व्हिडीओमुळे नियमांचं उल्लंघन झाल्याचा शेरा मारला आहे. आयसीसीच्या आरोपानुसार, आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान ड्रेसिंग रुममधील कोणताही व्हिडीओ रेकॉर्ड करणे आणि प्रसारित करणं हा प्लेयर आणि मॅच ऑफिशियल एरियाशी निगडीत नियमांचं उल्लंघन आहे. बीबीसीच्या एका अहवालानुसार, आयसीसीने यापूर्वी ईसीबीला याच नियमाबद्दल इशारा दिला होता. सामन्यादरम्यान ऑडिओ असलेला कोणताही व्हिडिओ प्रसारित केला जाऊ नये.

स्टोक्सने दिलं मजेशीर उत्तर

या वादानंतर इंग्लंड क्रिकेट व्यवस्थापनाला या नियमाबाबत माहिती नव्हतं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असं असताना या वादात आता माजी क्रिकेटपटू बेन स्टोक्सने उडी घेतली आहे. स्टोक्सने या बातमीची लिंक रिपोस्ट करत लिहिलं की, काढून टाका त्याला.. या पोस्टच्या माध्यमातून स्टोक्सने काही दिवसांपूर्वी त्यांना काढण्याची मागणी करत होते त्यांना टोला हाणला आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे