एकाच दिवशी टीम इंडिया दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेशशी भिडणार, असा असेल सुपर संडे

Indian Cricket Team: भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी 22 फेब्रुवारी 2026 अर्थात रविवारचा दिवस खास असणार आहे. या दिवशी दोन सामने पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. दोन्ही सामने वेगवेगळ्या स्पर्धेत आणि वेगळ्या ठिकाणी असणार आहेत.

एकाच दिवशी टीम इंडिया दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेशशी भिडणार, असा असेल सुपर संडे
एकाच दिवशी टीम इंडिया दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेशसी भिडणार, असा असेल सुपर संडे
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 21, 2026 | 3:41 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता रंगतदार टप्प्यावर आली आहे. साखळी फेरीचे सामने संपले असून सुपर 8 फेरीचा थरार अनुभवता येणार आहे. कारण या फेरीतून उपांत्य फेरीचे चार संघ ठरणार आहे. त्यामुळे स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे. भारताचा सुपर 8 फेरीतील पहिला सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. हा सामना 22 फेब्रुवारीला होणार आहे. पण या दिवशी भारतीय संघाचा आणखी एक सामना होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींसाठी रविवारचा दिवस खास असणार आहे. कारण या दिवशी भारतीय संघ आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय महिला आणि पुरूष संघ वेगवेगळ्या ठिकाणी सामने खेळणार असून क्रीडाप्रेमींसाठी हा दिवस खास ठरणार आहे.

भारतीय महिला संघ

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील भारतीय संघाच्या सामन्यापूर्वी महिला क्रिकेट संघाचा अंतिम सामना होणार आहे. एसीसी महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत ए आणि बांग्लादेश ए यांच्यात लढत होणार आहे. हा सामना बँकॉकच्या टर्डथाई क्रिकेट ग्राउंडमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजाता सुरु होणार आहे. भारत ए संघ सलग दुसऱ्यांदा जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत आपली छाप सोडली आहे. कर्णधार राधा यादवची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. आता अंतिम फेरीत भारतीय संघ बांगलादेशला पराभूत जेतेपदावर नाव कोरण्यासाठी प्रयत्नशील असेल.

सुपर 8 फेरीत भारत दक्षिण अफ्रिका

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकेशी आहे. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला पुढचा मार्ग सुकर होईल. अन्यथा जर तरच्या लढाईत उतरावं लागेल. भारत आणि दक्षिण अफ्रिका या दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी साखळी फेरीत केली आहे. त्यामुळे हा सामना अतितटीचा होईल यात काही शंका नाही. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होईल. भारताच्या गटात दक्षिण अफ्रिकेसह वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ आहेत.