AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2027 Auction: दुबई, जेद्दाहनंतर आता भारतात होणार आयपीएल 2027 चे ऑक्शन; कधी लागणार बोली?

आयपीएल 2027 स्पर्धेला आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. मार्चमध्ये या स्पर्धेला सुरूवात होणार असून मिनी लिलावाची उत्सुकता आहे. हा लिलाव भारतात होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

IPL 2027 Auction: दुबई, जेद्दाहनंतर आता भारतात होणार आयपीएल 2027 चे ऑक्शन; कधी लागणार बोली?
IPL 2027 Auction: दुबई, जेद्दाहनंतर आता भारतात होणार आयपीएल 2027 चे ऑक्शन; कधी लागणार बोली?Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 16, 2026 | 4:07 PM
Share

आयपीएल चाहत्यांसाठी आणि सर्व फ्रँचायझींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी आयपीएल 2027चा लिलाव यावेळेस भारतातच आयोजित केला जाणार आहे. 15 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या आयपीएल नियामक परिषदेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून देशाबाहेर होणारा खेळाडूंचा लिलाव आता पुन्हा एकदा मायदेशात होणार आहे. भारतात शेवटचा आयपीएल लिलाव 2023 मध्ये कोची येथे पार पडला होता. त्यानंतरचे सलग तीन लिलाव भारताबाहेर म्हणजेच दुबई, जेद्दाह आणि अबू धाबी येथे आयोजित करण्यात आले होते.

हा लिलाव याच वर्षी डिसेंबर 2026 मध्ये पार पडणार असून तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. भारतात ऑक्टोबर ते डिसेंबर हा लग्नाचा हंगाम असल्याने, फ्रँचायझींच्या सर्व सोयीसुविधा आणि पंचतारांकित हॉटेल्सची उपलब्धता पाहून नियामक परिषद लवकरच लिलावाच्या भारतीय शहराची घोषणा करेल. हा ‘मिनी’ लिलाव असल्याने संपूर्ण संघ बदलणार नाही, तर फक्त रिकाम्या जागा भरल्या जातील. त्यामुळे केकेआर आणि सीएसके सारखे मोठे बजेट असलेले संघ उपलब्ध स्टार खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडू शकतात. आयपीएल 2027 च्या मिनी लिलावासाठी सध्या कोलकाता नाइट रायडर्सकडे 64.3 कोटी आणि चेन्नई सुपर किंग्सकडे 43.4 कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे.

आयपीएल 2027 च्या मिनी लिलावाबरोबरच, पुढील वर्षाच्या म्हणजेच आयपीएल 2028 च्या मेगा लिलावाबाबतही एक मोठी अपडेट समोर आली आहे. 2028 चा मेगा लिलाव हा परदेशात आयोजित केला जाईल, यावर नियामक परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती ‘क्रिकबझ’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाचा पेच अजूनही कायम

15 सप्टेंबरच्या या बैठकीत लिलावाच्या ठिकाणांवर निर्णय झाला असला, तरी क्रिकेट जगतात वादग्रस्त ठरलेला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम चालू ठेवायचा की नाही, हा निर्णय अद्याप प्रलंबित ठेवण्यात आला आहे. या नियमावर फ्रँचायझी आणि खेळाडूंची मते जाणून घेतल्यानंतर, नियामक परिषदेच्या पुढील बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...