
भारतीय वुमन्स क्रिकेट संघाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेला 52 धावांनी पराभूत केलं. यासह पहिल्यांदाच जेतेपदाची चव चाखली आहे. वुमन्स क्रिकेट संघाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात जेतेपदाला गवसणी घातली. हरमनप्रीत कौरचं संयमी नेतृत्वामुळे टीम इंडियाची विजयाचा कळस चढवता आला. त्यामुळे भारतीय क्रिकेट इतिहासात हरमनप्रीत कौर हीचं नाव आता अजरामर झालं आहे. कारण भारतीय महिला संघाने तिच्या नेतृत्वात पहिल्यांदाच आयसीसी जेतेपदाला गवसणी घातली आहे. यापूर्वी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघाने 12 आयसीसी स्पर्धांमध्ये पराभवाचं तोंड पाहीलं होतं. मात्र 13व्या वेळी जेतेपद मिळवलं. या विजयानंतर हरमनप्रीत कौर खूश होती आणि भावुकही झाली आहे. या विजयानंतर तिने एक टीशर्ट परिधान केलं आणि संपूर्ण जगाला एक संदेशही दिला आहे.
हरमनप्रीत कौरने 3 नोव्हेंबरला एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. यात हरमनप्रीत कौर वर्ल्डकप ट्रॉफीसोबत झोपली आहे आणि टीशर्ट परिधान केलं असून त्यावर मेसेज लिहिला आहे. क्रिकेट हा फक्त जेंटलमन खेळ नाही तर सर्वांचा आहे. हरमनप्रीत कौरच्या मते हा खेळ कोणीही जिंकू शकतं. तोच संघ वारंवार जिंकेल असं नाही. कठोर परिश्रमाने कोणताही संघ विश्वविजेता होऊ शकतो, हे हरमनप्रीत कौरच्या संघाने सिद्ध करून दाखवलं आहे.
अंतिम सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. या मैदानात आरामात धावांचा पाठलाग होतो याची जाणीव असल्याने 300 पार धावांसाठी जोर लावला होता. पण भारतीय संघाने 298 धावा केल्या आणि विजयासाठी 299 धावांचं लक्ष्य ठेवलं. दक्षिण अफ्रिकेने या धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. त्यामुळे भारतीय संघ विकेट मिळवण्यासाठी धडपडत राहीला. पण पहिली विकेट चांगल्या क्षेत्ररक्षणाचं फळ ठरलं. त्यानंतर दुसरी विकेट लगेच मिळाली. तिसऱ्या विकेटसाठी मात्र धडपड करावी लागली. पण हरमनप्रीत कौरने शफाली वर्माच्या हाती चेंडू सोपवला आणि सामन्याचं चित्र बदललं. तिने सून लीस आणि मॅरिझान कॅपची विकेट काढली आणि सामना भारताच्या पारड्यात झुकवला.