FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत असणार ‘हायड्रेशन ब्रेक’, पहिल्यांदाच असं का ते जाणून घ्या

फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठी आता फक्त 5 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या संघांचे गटही पाडण्यात आले आहेत. पण एका नव्या नियमाने लक्ष वेधून घेतलं आहे. प्रत्येक हापच्या 22व्या मिनिटाला हा नियम लागू असेल. का ते जाणून घ्या.

FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत असणार हायड्रेशन ब्रेक, पहिल्यांदाच असं का ते जाणून घ्या
फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत असणार 'हायड्रेशन ब्रेक', पहिल्यांदाच असं का ते जाणून घ्या
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 12, 2025 | 8:02 PM

फिफा वर्ल्डकप स्पर्धा चार वर्षांनी पुन्हा एकदा क्रीडारसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. ही स्पर्धा उत्तर अमेरिका अर्थात मॅक्सिको, अमेरिका आणि कॅनडात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 48 संघांनी भाग घेतला असून आजवरची सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. जगातील बहुतांश संघ या स्पर्धेत आपलं नशिब आजमावणार आहेत. या स्पर्धेला 11 जूनपासून सुरुवात होणार आहे. तसेच अंतिम सामना 19 जुलैला होणार आहे. चार संघांचे एकूण 12 गट तयार करण्यात आले आहेत. साखळी फेरीत सर्व संघ त्या त्या गटात एकमेकांशी एकदा खेळतील. 68 गट टप्प्यातील सामन्यांनंतर, 12 गटांपैकी प्रत्येकी दोन संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतील. असं असताना या स्पर्धेत एका नव्या नियमाची भर पडली आहे. आता प्रत्येक सामन्यातील दोन्ही डावात तीन मिनिटांचा हायड्रेशन ब्रेक असेल.

वर्ल्डकप स्पर्धेत प्रत्येक सामन्यातील प्रत्येक डावाच्या 22व्या मिनिटाला रेफरी सामना थांबवतील. कारण खेळाडू पाणी पिऊ शकतील आणि स्वत:ला कूल करू शकतात. दुखापतीमुळे किंवा व्यत्ययामुळे 22व्या मिनिटाआधी खेळ थांबवण्याची वेळ आली तर त्या विलंबात हायड्रेशन ब्रेक घेतला जाऊ शकतो. मैदानावरील हा निर्णय घेण्याचा अधिकार मैदानातील रेफरीकडे असेल. हा नियम अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमधील प्रगत वातानुकूलित प्रणाली असलेल्या स्टेडियमवर देखील लागू असेल.

अमेरिकेत झालेल्या फिफा क्लब वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान खेळाडूंना जास्त आर्द्रता आणि उकाड्याचा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे या तीन मिनिटांच्या ब्रेकचा प्रायोजकांना लाभ होणार आहे. कारण या तीन मिनिटांच्या ब्रेकमध्ये जाहिराती दाखवण्यात येतील. कारण फुटबॉलसारख्या खेळात ब्रेक नसतो. त्यामुळे जाहिराती सामना सुरू होण्यापूर्वी आणि मधल्या हाफमध्ये दाखवल्या जात होत्या. आता त्यांना संधीचा लाभ मिळेल.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी एकूण गट

  • गट अ: मॅक्सिको, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, युरोपियन प्लेऑफ ड मधील विजेता
  • गट ब: कॅनडा, स्वित्झर्लंड, कतार, युरोपियन प्लेऑफ अ चा विजेता
  • गट क: ब्राझील, मोरोक्को, स्कॉटलंड, हैती
  • गट ड: अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पॅराग्वे, युरोपियन प्लेऑफ क विजेता
  • गट ई: जर्मनी, इक्वेडोर, आयव्हरी कोस्ट, कुराकाओ
  • गट फ: नेदरलँड्स, जपान, ट्युनिशिया, युरोपियन प्लेऑफ ब विजेता
  • गट जी: बेल्जियम, इराण, इजिप्त, न्यूझीलंड
  • गट एच: स्पेन, उरुग्वे, सौदी अरेबिया, केप व्हर्डे
  • गट I: फ्रान्स, सेनेगल, नॉर्वे, फिफा प्लेऑफ 2 चा विजेता
  • गट जे: अर्जेंटिना, ऑस्ट्रिया, अल्जेरिया, जॉर्डन
  • गट के: पोर्तुगाल, कोलंबिया, उझबेकिस्तान, फिफा प्लेऑफ 1 चा विजेता
  • गट एल: इंग्लंड, क्रोएशिया, पनामा, घाना