RCB च्या खेळाडूने पाकड्यांची जिरवली; षटकार, चौकारांनी मैदान गाजवले, अमेरिकेत पाकिस्तान संघाला लोळवले

Top End T20 Series : टॉप एंड टी20 सीरीज 2025 मध्ये अमेरिकेतील नवख्या पोरांनी दिग्गज खेळाडूंनी कसून सराव केलेल्या पाकिस्तानी संघाला धूळ चारली. पाकिस्तानचे शाहींस अस्त्र फेल गेले. यामध्ये भारतीय वंशाच्या खेळाडूचे योगदान होते. त्याच्या धमाकेदार खेळीने पाकची फजिती झाली.

RCB च्या खेळाडूने पाकड्यांची जिरवली; षटकार, चौकारांनी मैदान गाजवले, अमेरिकेत पाकिस्तान संघाला लोळवले
पाकिस्तानचा पराभव
| Updated on: Aug 19, 2025 | 3:31 PM

टॉप एंड टी20 सीरीज 2025 टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानचे शाहींस अस्त्र फेल गेले. अमेरिकेच्या क्लब शिकागो किंग्समॅनविरोधात पाकिस्तानच्या शाहींसना 69 धावांनी पराभव पत्कारावा लागला. शिकागो संघाकडून भारतीय वंशाचा अमेरिकन खेळाडू मिलिंद कुमार यांनी धमाकेदार फलंदाजी केली. त्याच्या अर्धशतकीय खेळीने विजयात बहुमोल वाटा उचलला. त्याने पाकिस्तानच्या सर्व गोलदांजाचा चांगलाच समाचार घेतला. त्याने धमाकेदार खेळी खेळली. त्याला प्लेअर ऑफ द मॅच हा सन्मान मिळाला.

मिलिंद कुमारचा जलवा

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना शिकागो संघाने 20 षटकात 5 बळी देऊन 206 धावा केल्या. संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी 8 षटकातच 57 धावा करत 3 बळी दिले. शयान जहांगीर याने चांगली सुरुवात केली. पण त्याला मैदानावर टिकता आले नाही. तो 30 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मिलिंद कुमारने तेजिंदर सिंह याच्यासोबत मैदान गाजवले. चौथा बळी जाण्यापूर्वी त्याने 102 धावांची खेळी केली. मिलिंद कुमारने 37 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकार ठोकले. कुमारने 74 धावा चोपल्या. तर तेजिंदर सिंहने 37 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 58 धावांची तुफान खेळी केली.

मिलिंद कुमार अमेरिकेतील ऑलराऊंडरपैकी एक आहे. राष्ट्रीय संघाकडून त्याने 21 टी20 सामन्यांमध्ये 32.20 च्या सरासरीने 322 धावा केल्या आहेत. नाबाद 56 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. या युवा खेळाडूने 18 एकदिवसीय सामन्यांमध्ये 52.46 सरासरीने 682 धावा केल्या आहेत. या सामन्यात त्याची सर्वोत्तम 155 धावांची नाबाद खेळी आहे. त्याने गोलंदाजी करताना 27 बळी घेतले आहे. मिलिंद कुमार अमेरिकेत जाण्यापूर्वी भारतात क्रिकेट खेळत होता. त्याने आयपीएल दिल्ली आणि आरसीबीचे प्रतिनिधित्व केले आहे. तर टॉप एंड टी20 मालिका 2025 मध्ये मिलिंद कुमारने दमदार खेळी केली. त्याने तीन सामन्यात 37.33 च्या सरासरीने 112 धावा केल्या. त्याची सर्वोत्तम खेळी 74 धावांची आहे.

शिकागो किंग्समॅनने जिंकला सामना

पाकिस्तान शाहींस संघ 20 षटकात 8 बळी देत 137 धावांवर गारद झाला. टीमकडून यासिर खान याने 38 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त कर्णधार इरफान खान याने 24 धावांची खेळी केली. तर शाहिद अजीज याने 24 धावा केल्या. किंग्समॅनकडून स्कॉट कुग्गेलेयझनने 4 षटकारांमध्ये 19 धावा देऊन 3 बळी घेतले. तर एहसान आदिल यांनी 2 बळी घेतले. शिकागो संघाची या टुर्नामेंटमधील 3 सामने खिशात घातले आहे.