AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजू सॅमसनने क्रिकेट सोडलं? फुटबॉल टीमकडून मोठी जबाबदारी

अनेकवेळा संजूकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे मात्र हार मानेल तो संजू कसला. निवड समितीला आपल्या नावाचा विचार करण्यासाठी भाग पाडणाऱ्या संजू सॅमसनच्या शिरपेचात मानााचा तुरा रोवला गेला आहे.

संजू सॅमसनने क्रिकेट सोडलं? फुटबॉल टीमकडून मोठी जबाबदारी
| Updated on: Feb 07, 2023 | 12:00 AM
Share

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीआधी भारतीय संघाचा खेळाडू संजू सॅमसनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दुखापतीमुळे बाहेर पडलेला संजू पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेकवेळा संजूकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे मात्र हार मानेल तो संजू कसला. निवड समितीला आपल्या नावाचा विचार करण्यासाठी भाग पाडणाऱ्या संजू सॅमसनच्या शिरपेचात मानााचा तुरा रोवला गेला आहे. कसोटी मालिकेआधी संजू सॅमसनकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

संजू सॅमसनकडे कोणती जबाबदारी? ‘इंडियन सुपर लीग’ या स्पर्धेतील केरळा ब्लास्टर्स एफसी संघाने संजू सॅमसनला संघाचं ब्रँड एम्बॅसेडरची जबाबदारी दिली आहे. संजू सॅमसनने मैदानावर रेकॉर्ड करून नाहीतर जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Sanju Samson Kerala Blasters FC Brand Ambassador) केरळच्या युवा खेळाडूंसाठी संजू एक प्रेरणा आहे.

लहानपासूनच फुटबॉल हा नेहमीच माझ्या हृदय जवळचा खेळ राहिला आहे. माझे वडिल व्यावसायिक फुटबॉलपटू होते. या क्लबने राज्यातील फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खूप काही केलं आहे. क्लबकडून देण्यात आलेली जबाबदारी स्वीकारली असून खेळ वाढवण्यासाठी मी तयार असल्याचं संजू सॅमसन म्हणाला.

दरम्यान, इंडियन सुपर लीगमध्ये केरळ ब्लास्टर्सचा मागील पाच सामन्यांमध्ये संघाला तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.तर दोन सामने जिंकले आहेत.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.