IPL 2022 Covid-19 Case: दिल्लीचा संघ कोरोनाच्या विळख्यात, फिजियोनंतर महत्त्वाचा खेळाडू बाधित, पुण्याला जाणं कॅन्सल

| Updated on: Apr 18, 2022 | 3:26 PM

आयपीएल 2022 (IPL 2022) दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals Covid-19 Cases) संघावर कोरोना विषाणूचा धोका वाढत असल्याचं दिसत आहे. या संघाला त्यांच्या पुढील सामन्यासाठी 18 एप्रिल रोजी पुण्याला जायचे होते, परंतु त्यांचा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

IPL 2022 Covid-19 Case: दिल्लीचा संघ कोरोनाच्या विळख्यात, फिजियोनंतर महत्त्वाचा खेळाडू बाधित, पुण्याला जाणं कॅन्सल
Delhi Capitals - RIshabh Panr
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals Covid-19 Cases) संघावर कोरोना विषाणूचा धोका वाढत असल्याचं दिसत आहे. या संघाला त्यांच्या पुढील सामन्यासाठी 18 एप्रिल रोजी पुण्याला जायचे होते, परंतु त्यांचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व खेळाडूंना आपापल्या खोलीत क्वारंटाईन करण्यात आले आहे. 18 आणि 19 एप्रिल या दोन्ही दिवशी सर्व खेळाडूंच्या त्यांच्या खोलीत कोविड-19 चाचण्या होणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट (Patrick Farhart) नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्यापूर्वी ही माहिती समोर आली होती. यानंतर दिल्लीच्या खेळाडूंना सांगण्यात आले की ते सामन्यानंतर किंवा दरम्यान आरसीबीच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाहीत किंवा मिठी मारणार नाहीत.

क्रिकबजच्या बातमीनुसार, दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला असल्याचे समजते. रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये हे रिपोर्ट्स समोर आले आहेत. खेळाडूच्या आरटी-पीसीआर चाचणीचा निकाल अजून येणे बाकी आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना 20 एप्रिल रोजी पुण्यात पंजाब किंग्ज विरुद्ध होणार आहे. आयपीएल 2022 च्या आतापर्यंतच्या सीझनमध्ये फक्त दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, यावेळी बायो बबलचे नियम मागील हंगामासारखे कडक नाहीत. भारतात कोरोनाच्या कमी केसेसमुळे नियम शिथील करण्यात आले आहेत. पण दिल्ली कॅपिटल्स संघातील घडामोडी बीसीसीआयची चिंता वाढवू शकतात.

IPL 2022 मध्ये कोरोनाचे नियम बदलले

आयपीएल 2022 मध्ये कोरोनाबाबतचे नियम बदलण्यात आले. या अंतर्गत 12 निरोगी खेळाडू उपलब्ध असल्यास संघ सामना खेळू शकतो. यासाठी सात भारतीय खेळाडू असणे आवश्यक आहे. 12 पैकी एक पर्यायी क्षेत्ररक्षक असावा. अन्यथा, बीसीसीआय सामन्याचे वेळापत्रक बदलू शकते. तसे न झाल्यास आयपीएलची तांत्रिक समिती सामन्याच्या निकालाबाबत निर्णय घेईल.

IPL 2021 मध्ये कोरोनाचा अडथळा

जवळपास दोन वर्षांनंतर आयपीएल यावेळी पूर्णपणे भारतात होत आहे. गेल्या मोसमातही ही स्पर्धा भारतातच सुरू झाली होती. पण नंतर ती यूएईला हलवाली लागली. अनेक संघांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान स्पर्धा रद्द करण्यात आली आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्यात आली. गेल्या हंगामातही जवळपास अर्ध्या प्रवासानंतर कोरोनाचे रुग्ण आढळले होते. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते.

इतर बातम्या

Umran Malik : इंग्रजांचे षटकार खेचून देणार हा गोलंदाज, उमरानच्या धडाकेबाज कामगिरीचं शशी थरूरांकडून कौतुक

IPL 2022, CSK vs GT, Purple Cap : गुजरातचा चेन्नईवर 3 गडी राखून विजय, पर्पल कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

IPL 2022, CSK vs GT, Orange Cap : चेन्नईला धुळ चारत गुजरातने सामना जिंकला, ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?