
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 277 धावा केल्या. तसेच विजयासाठी 278 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने या धावांचा पाठलाग करताना 47.3 षटकात 250 धावा केल्या. तसेच विजयासाठी 27 धावा तोकड्या पडल्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ओलिवर पीकने शतकी खेळी केली. पण त्याची झुंझार खेळी व्यर्थ गेली. ओलिवर पीकने 88 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 100 धावा केल्या. पण त्याला इतर खेळाडूंची हवी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं.
इंग्लंडची सुरूवात काही चांगली झाली नव्हती. आघाडीचे तीन फलंदाज मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. बेन डॉवकिन्स 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर जोसेफ मूर्सने 25 आणि बेन मायसने 24 धावा केल्या. संघ अडचणीत असताना कर्णधार आणि विकेटकीपर थॉमस रूने शतक ठोकलं. त्यामुळे इंग्लंडचा डाव काही अंशी सावरला. त्याने 107 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकार मारत 110 धावांची खेळी केली. तर कॅलेब फाल्कनरने 40 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. राल्फी अल्बर्टने 15, फरहान अहमदने 28, सॅबेस्टीन मॉर्गनने 15 आणि जेम्स मिंटोने 2 धावा केल्या.
इंग्लंडचा कर्णधार थॉमस म्हणाला की, मला वाटतं की तिथे पोहोचायचं. तशीच कामगिरी आम्ही केली. शेवटी आमच्या गोलंदाजांना श्रेय द्यायचं आहे.मला वाटतं की आम्ही आमचे सर्व बेस तयार केले आहेत. हा एक उत्तम संघ आहे. संपूर्ण स्पर्धेत सर्वांनीच प्रगती केली आहे. मला वाटतं की आम्ही आज हा आत्मविश्वास वाढवत राहिलो आणि सुदैवाने आज त्याचा फायदा झाला. मला वाटले की ते थोडे चांगले विकेट होते. मला वाटले की फलंदाजी करताना मला ते थोडे कठीण वाटले. म्हणून मी त्याला थोडा जास्त काळ खेळायला ठेवायचे होते आणि नंतर फरहान आणि राल्फ, जे उत्तम फिरकीपटू आहेत, त्यांना थोडे नंतर खेळायला ठेवायचे होते आणि त्यांच्या षटकांचा वापर डेथवर करायचा होता.