
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या करो या मरोच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. त्यामुळे भारताला मोठं टार्गेट उभं करणं गरजेचं होतं. पण भारताचा डाव गडगडला. आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यामुळे टीम इंडियावरील दडपण वाढलं. मधल्या फळीत वेदांत त्रिवेदीने डाव सावरला. त्याच्या 68 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाला बळ मिळालं. तर आरएस अंब्रिशने 29, कनिष्क चौहाने 35 आणि खिलान पटेलने 21 धावा केल्या. त्यांच्या खेळीमुळे भारताने 252 धावांपर्यंत मजल मारली. खरं तर हे आव्हान पाकिस्तानसाठी जड होतं. कारण हे आव्हान 50 षटकात पूर्ण करून काही फायदा नव्हता. हा सामना जिंकून नाही तर 33.3 षटकात पूर्ण करणं गरजेच होतं. पाकिस्तानला हे काही जमलं नाही. त्यामुळे पाकिस्तानचं सामना संपण्यापूर्वीच उपांत्य फेरीचं गणित बिघडलं.
पाकिस्तानने विजयी धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. हमजा झहूर आणि समीर मिन्हास यांनी 23 धावांची भागीदारी केली. पण समीर मिन्हास अवघ्या 9 धावा करून बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानवरील दडपण वाढलं. त्यानंतर हमजा झहूर आणि उस्मान खान यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने 80 चेंडूत 65 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. पण ही जोडी फुटला आणि संघाचं टेन्शन दूर झालं. हमजा झहूर 42 धावा करून बाद झाला. त्यानंतर उस्मान खान आणि कर्णधार फरहान युसूफ ही जोडी जमली. उस्मान खानने 77 चेंडूत 5 चौकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. फरहान युसूफ 39 चंडूत 38 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेला अहमद हुसैन काही खास करू शकला नाही. त्याने 6 चेंडूत फक्त 2 धावा केल्या.
Henil Patel gets an important, early breakthrough for India☝️#U19WorldCup broadcast details 👉 https://t.co/gGyxHpswKS pic.twitter.com/MQWKFq0Z4w
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 1, 2026
पाकिस्तानने 33.3 षटकात 4 गडी गमवून 167 धावा केल्या. खरं तर भारताने विजयासाठी दिलेलं 252 धावांचं आव्हान 33.3 षटकात पूर्ण करायचं होतं. पण पाकिस्तानचा संघ धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना जिंकला तरी काही फरक पडणार नाही. कारण भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं आहे. पाकिस्तानपेक्षा भारताचा नेट रनरेट हा चांगला आहे. त्यामुळे आता विजय मिळवला तरी त्यात काही फरक पडणार नाही. भारताचा नेट रनरेट हा +3.337 आहे, तर पाकिस्तानचा नेट रनरेट हा +1.484 इतका आहे.