AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup Final : भारत ऑस्ट्रेलिया संघातील हे खेळाडू पॉइंट्सच्या गणितात ठरतील वरचढ, जाणून घ्या

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामना भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यात कोण जिंकेल ते सामना झाल्यानंतरच स्पष्ट होईल. पण दोन्ही संघातील खेळाडूंवर बारीक नजर असणार आहे. कोणते खेळाडू पॉइंट्सच्या गणितात वरचढ ठरतील हे जाणून घेऊयात. त्यामुळे योग्य कर्णधार आणि उपकर्णधाराची निवड करणं सोपं जाईल.

U19 World Cup Final : भारत ऑस्ट्रेलिया संघातील हे खेळाडू पॉइंट्सच्या गणितात ठरतील वरचढ, जाणून घ्या
U19 World Cup Final : भारत ऑस्ट्रेलिया संघातील या 11 खेळाडूंवर असेल नजर, जाणून घ्या कर्णधार आणि उपकर्णधार
| Updated on: Feb 10, 2024 | 5:35 PM
Share

मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी उत्तम कामगिरी केली आहे. प्रत्येक सामन्यात कोणी ना कोणी विजयाचा शिल्पकार ठरला आहे. त्यामुळे एक दोन खेळाडूच वरचढ ठरतील हा अंदाज चुकीचा आहे. त्यामुळे ऐनवेळी कोणाची बॅट तळपेल किंवा कोण भेदक गोलंदाजी करेल सांगता येत नाही. त्यात खेळपट्टीचा अंदाजही महत्त्वाचा ठरतो. पाटा विकेटवर खोऱ्याने धावा होतात. तर उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर गोलंदाज वरचढ ठरतात. त्यामुळे खेळपट्टीच्या अंदाजापासून खेळाडूंचा फॉर्म खूपच महत्त्वाच ठरतो. उपांत्य फेरीत भारताचे आघाडी फलंदाज झटपट बाद झाले होते. त्यानंतर सचिन धस आणि कर्णधार उदय सहारन यांनी डाव सावरला. साखळी फेरीत मुशीर खानची बॅट तळपली होती. त्याच्यामुळे कोणता प्लेयर कसा चमकेल सांगता येत नाही.

पिच रिपोर्ट

विलोमूर पार्क येथील खेळपट्टीवर फलंदाजांचा चांगलाच कस लागणार आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. या मैदानात पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी 190 च्या आसपास राहिली आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला खेळपट्टी फायदेशीर आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला जाईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत अंडर-19: आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.

ऑस्ट्रेलिया अंडर-19: हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), टॉम कॅम्पबेल, ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर.

पॉइंट्सच्या गणितात हे खेळाडू ठरू शकतात वरचढ

  • यष्टिरक्षक: अरावेली अवनीश, रायन हिक्स
  • बॅटर्स : ह्यू वेबगेन, उदय सहारन, सॅम कोन्स्टास, सचिन धस
  • अष्टपैलू : मुशीर खान
  • गोलंदाज : नमन तिवारी, टॉम स्ट्रेकर, कॅलम विडलर, सौम्य पांडे
  • कर्णधार : सचिन धस
  • उपकर्णधार: ह्यू वेबगेन

Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित