U19 World Cup IND vs SA : उपांत्य फेरीत या खेळाडूंकडून असतील मोठ्या अपेक्षा, पॉइंट्सच्या गणितात ठरू शकतात वरचढ

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धा आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. तीन सामन्यानंतर जेतेपदाचा मानकरी ठरणार आहे. उपांत्य फेरीचा पहिला सामना भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. भारताची या स्पर्धेतील कामगिरी चांगली राहिली आहे. पण दक्षिण अफ्रिकेला होम ग्राउंडचा फायदाही आहे.

U19 World Cup IND vs SA : उपांत्य फेरीत या खेळाडूंकडून असतील मोठ्या अपेक्षा, पॉइंट्सच्या गणितात ठरू शकतात वरचढ
U19 World Cup IND vs NZ : उपांत्य फेरीत या खेळाडूंवर असेल पॉइंट्सची मदार, जाणून घ्या कोणते प्लेयर्स ठरतील बेस्ट
| Updated on: Feb 05, 2024 | 10:25 PM

मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत भारत दक्षिण अफ्रिका हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. दक्षिण अफ्रिकेच्या सहारा पार्क विलोमूरे मैदानात हा सामना होणार आहे. भारताने साखळी फेरी आणि सुपर सिक्समधील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. तर दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडविरुद्धचा एकमेव सामना पावसाच्या व्यत्ययामुळे गमावला आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडने 36 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे ग्रुप 2 मध्ये दक्षिण अफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेचं तगडं आव्हान असणार आहे. आदर्श सिंग, मुशीर खान, उदय सहारन, अर्शीन कुलकर्णी, सचिन धस यांनी चांगली कामगिरी केली आहे. तर दक्षिण अफ्रिकेच्या क्वेना माफाका हा गोलंदाज फलंदाजांसाठी त्रासदायक ठरला आहे. असं असलं तरी काही खेळाडूंच्या कामगिरीवर बारीक नजर असणार आहे. आतापर्यंत कामगिरीमुळे पॉइंट्सचं गणित सुटू शकतं.

वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू या दोघांनाही ही खेळपट्टी मदत करणारी असेल. त्यामुळे दोन्ही संघ नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देतील. तर वातावरणाच्या अंदाजानुसार सामन्यात कोणत्याही व्यत्यय येणार नाही. बेनोनी येथे मंगळवारी 29 अंश सेल्सिअस तापमानासह सूर्यप्रकाशाचा अंदाज आहे. पावसाचे कोणतेही चिन्ह नाही आणि आर्द्रता पातळी सुमारे 36 टक्के असेल. तर वाऱ्याचा वेग 18 किमी/तास असेल.

भारत अंडर-19 वि दक्षिण आफ्रिका अंडर-19 ड्रीम11 अंदाज

  • कर्णधार: आदर्श सिंग
  • उपकर्णधार: मुशीर खान किंवा सचिन धस
  • यष्टिरक्षक: लुआन-ड्रे प्रिटोरियस
  • फलंदाज: उदय सहारन, आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, डेव्हिड टीगर
  • अष्टपैलू: मुशीर खान, अर्शीन कुलकर्णी
  • गोलंदाज: क्वेना माफाका, नमन तिवारी, रिले नॉर्टन, सौम्य पांडे

भारत अंडर-19 दोन्ही संघांची संभाव्य XI:

भारत अंडर-19 संभाव्य इलेव्हन: आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), सचिन दास, मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी, सौम्य पांडे

दक्षिण आफ्रिका अंडर-19 संभाव्य इलेव्हन: लुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), स्टीव्ह स्टोल्क, डेव्हिड टीगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान माराईस, जुआन जेम्स (कर्णधार), रोमाशन पिल्ले, रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, सिफो पोटसेन, क्वेना माफाका