AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: Umran Malik च्या 155KMPH स्पीडसमोर श्रीलंकेचा कॅप्टन हतबल, VIDEO

IND vs SL: उमरानच्या वेगामुळे कव्हर्सच्या वरुन चौकार मारण्यात दासुन शनाका कसा फसला? ते या VIDEO मध्ये पहा....

IND vs SL: Umran Malik च्या 155KMPH स्पीडसमोर श्रीलंकेचा कॅप्टन हतबल, VIDEO
Ind vs sl umran malikImage Credit source: BCCI
| Updated on: Jan 04, 2023 | 10:18 AM
Share

मुंबई: टीम इंडिया आणि श्रीलंकेत मंगळवारी पहिला T20 सामना झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर 2 रन्सनी विजय मिळवला. श्रीलंकेने टीम इंडियाला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना विजय मिळू शकला नाही. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 162 धावा केल्या. श्रीलंकेच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 160 धावा केल्या. श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाकाने लढत देण्याचा प्रयत्न केला. पण उमरान मलिकच्या एका वेगवान चेंडूने शनाकाचा खेळ संपवला. उमरान मलिक वेगासाठी ओळखला जातो. या मॅचमध्ये त्याचा तोच अंदाज पहायला मिळाला.

शनाकाची जबरदस्त बॅटिंग

शनाका क्रीजवर असताना, श्रीलंकेच्या विजयाची शक्यता दिसत होती. पण कॅप्टन आऊट होताच टीमला झटका बसला. चरिथा असालंकाने टीमला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. शनाकाने 27 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. असालंकाने 16 चेंडूत 23 धावा केल्या.

155 KMPH ने संपवला खेळ

श्रीलंकेचा कॅप्टन वेगाने धावा बनवत होता. त्यावेळी कॅप्टन हार्दिक पंड्याने 17 व्या ओव्हरमध्ये उमरान मलिकच्या हाती चेंडू सोपवला. मलिकने या ओव्हरमध्ये चौथ्या चेंडूवर शनाकाला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. शनाकाने उमरानचा ऑफ स्टम्प बाहेरचा चेंडू कव्हर्सच्या वरुन मारण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. युजवेंद्र चहलच्या हाती त्याने सोपा झेल दिला.

उमरानने याआधी किती वेगात चेंडू टाकलाय?

उमरानने आपल्या वेगाचा हुशारीने वापर केला. उमरानने शनाकाला ज्या चेंडूवर बाद केलं, त्याचा वेग 155 KMPH होता. उमरानने यापेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकलेत. आयपीएल 2022 मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना त्याने 157 किमीप्रतितास वेगाने गोलंदाजी केलीय. न्यूझीलंड विरुद्ध 25 नोव्हेंबरला उमरानने 153.1 किमी प्रतितास वेगात चेंडू टाकलाय. उमरानची कमाल

या मॅचमध्ये उमरानने आपल्या वेगाने मन जिंकलं. उमरानने चार ओव्हर्समध्ये 27 धावा देऊन दोन विकेट काढल्या. उमरानचा हा चौथा टी 20 सामना होता. या चार सामन्यात उमरानच्या नावावर चार विकेट आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.