AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens U19 T20 WC : 16 संघ, 16 दिवस, 4 ग्रुप आणि 1 ट्रॉफी, 18 जानेवारीपासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात

Womens U19 T20 World Cup 2025 Schedule : आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला शनिवार 18 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. एकूण 16 दिवसांमध्ये 41 सामने खेळवण्यात येणार आहेत. जाणून घ्या सर्वकाही.

Womens U19 T20 WC : 16 संघ, 16 दिवस, 4 ग्रुप आणि 1 ट्रॉफी, 18 जानेवारीपासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात
U 19 Womens World Cup 2025 ScheduleImage Credit source: Icc X account
| Updated on: Jan 17, 2025 | 5:51 PM
Share

क्रिकेट चाहत्यांना एका बाजूला आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे वेध लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला शनिवार 18 जानेवारीपासून अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत. या 16 संघांना 4-4 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा मलेशियाकडे आहे. मलेशियाची 17 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचं आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकूण 16 दिवसांमध्ये 41 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेतील पहिल्याच दिवशी एकूण 6 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर 2 फेब्रुवारीला अंतिम सामना पार पडेल.

16 संघ आणि 4 गट

ए ग्रुप : टीम इंडिया, श्रीलंका, वेस्टइंडीज आणि मलेशिया

बी ग्रुप : पाकिस्तान, आयर्लंड, इंग्लंड आणि यूएसए

सी ग्रुप : दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, नायजेरिया आणि सामोआ

डी ग्रुप : ऑस्ट्रेलिया, स्कॉटलँड, बांगलादेश आणि नेपाळ

नायजेरिया आणि सामोआ या दोन्ही संघांची अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ आहे. एकूण 16 दिवस 16 संघात 41 सामने खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीतील इतर 3 संघांविरुद्ध 1-1 सामना खेळणार आहे. त्यानंतर प्रत्येक गटातून अव्वल 3 संघ (एकूण 12) सुपर 12 साठी पात्र ठरतील.

स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

त्यानंतर ग्रुप बी आणि ग्रुप सीमधील संघ (एकूण 6) एका गटात तर ग्रुप ए आणि ग्रुप डी मधील संघ दुसर्‍या गटात (एकूण 6) ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील दोन्ही सामने 31 जानेवारीलाच पार पडतील. तर 2 फेब्रुवारीला अंतिम सामन्याच्या निकालानंतर विजेता संघ निश्चित होईल.

शनिवारपासून अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला सुरुवात

गतविजेता टीम इंडिया

अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2023 साली झालेल्या या स्पर्धेत टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करत पहिलावहिला महिला वर्ल्ड कप जिंकला होता. टीम इंडियाने शफाली वर्मा हीच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती.

दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर.
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.