AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबर आझमने टीम इंडियाच्या जर्सीवर केली स्वाक्षरी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच…

बाबर आझम आणि वाद आता काही नवीन राहीलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये सध्या खेळत आहे. पण त्याचा फॉर्म काही दिसत नाही. असं असताना त्याने एक नवीन वादाला फोडणी दिली आहे.

बाबर आझमने टीम इंडियाच्या जर्सीवर केली स्वाक्षरी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच...
बाबर आझमने टीम इंडियाच्या जर्सीवर केली स्वाक्षरी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच...Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 29, 2025 | 4:21 PM
Share

भारत पाकिस्तान यांच्यातील संबंधांना गेल्या काही वर्षात तडा गेला आहे. आयसीसी आणि मल्टी नॅशनल स्पर्धांमध्ये दोन्ही खेळाडू हस्तांदोलनही करत नाहीत. त्यामुळे वाद किती टोकाचा आहे हे दिसून येतं. असं असताना बाबर आझमच्या एका कृतीने संतापाची लाट उसळली आहे. त्याच्या एका ऑटोग्राफने नव्या वादाला जन्म दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्याच्यावर कारवाई करू शकते. पाकिस्तानचा बाबर आझम ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे.बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळत आहे आणि आतापर्यंत त्याची कामगिरी निराशाजनक आहे.चार सामन्यात फक्त 71 धावा केल्या आहेत. इतकंच काय तर त्याचा स्ट्राइक रेट देखील 110 आहे. त्याच्या चारपैकी तीन डावांमध्ये तो दुहेरी आकडी धावसंख्या गाठण्यात अपयशी ठरला आहे.

बिग बॅश लीग स्पर्धेदरम्यान बाबर आझमने टीम इंडियाच्या एका चाहत्याला ऑटोग्राफ दिला. पण या चाहत्याने टीम इंडियाची जर्सी परिधान केली होती. त्या जर्सीवरच बाबर आझमने ऑटोग्राफ दिल्याने संतापाची लाट उसळली आहे. इतकंच काय तर त्या चाहत्यासोबत बाबर आझमने सेल्फीही घेतला. फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. कारण भारतीय संघाच्या जर्सीवर ऑटोग्राफ केल्याने संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी प्रतिक्रिया देताना टीम इंडियाच्या जर्सीचा अपमान असल्याचं म्हंटलं आहे. इतकंच काय तर बाबर आझमला खडे बोलही सुनावले आहेत.

दरम्यान बाबर आझमला श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी पाकिस्तान संघातून डावललं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान दोघेही खेळणार नाहीत. शादाब खान 15 सदस्यीय संघात परतला आहे. तर सलमान अली आगा संघाचे नेतृत्व करत आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा टी20 संघ: सलमान अली आगा (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा नाफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सैम अयुब, शादाब खान, उस्मान तारिक, मोहम्मद खान.

दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर.
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.