USA vs PAK Tie: पाकिस्तान-यूएसए सामना टाय, Super Over होणार

United States vs Pakistan Match Tie: यूनायटेड स्टेटस विरुद्ध पाकिस्तान सामना टाय झाला आहे. त्यामुळे आता सुपर ओव्हर होणार आहे.

USA vs PAK Tie: पाकिस्तान-यूएसए सामना टाय, Super Over होणार
Nitish Kumar and Aaron Jones
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jun 07, 2024 | 2:14 AM

ओमान विरुद्ध नामिबियानंतर आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील दुसरा सामना टाय झाला आहे. यूएसएचा फलंदाज नितीश कुमार याने विजयासाठी शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज असताना चौकार ठोकल्याने सामान बरोबरीत सुटला.  त्यामुळे आता सामना टाय झाला आहे. त्यामुळे आता सुपर ओव्हरने निकाल लागणार आहे.  पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना यजमान संघाने चिवट झुंज देत सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत आणला.  यूएसएला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 15 धावा हव्या होत्या.  या ओव्हरमधील प्रत्येक बॉलवर दोन्ही संघांच्या चाहत्यांची धाकधुक वाढत होती. यूएसए सामना गमावते की काय, असंच वाटत होतं. मात्र नितीश कुमारने अखेरच्या चेंडूवर 5 धावा पाहिजे असताना चौकार ठोकून यूएसएला सामन्यात कायम राखलं आणि सामना टाय केला.

यूएसएने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 159 धालवा केल्या. ओपनर स्टीव्हन टेलर याने 12 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. यूएसएकडून कॅप्टन मोनांक सिंह याने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. अँड्रिज गॉस याने 35 धावांचं योगदान दिलं. तर आरोन जोन्स आणि नितीश कुमार ही जोडी नाबाद राहिली. आरोनने 36 आणि नितीशने 14 धावा केल्या. तर पाकिस्तानकडून मोहम्मद आमिर, नसीम शाह आणि हरीस रौफ या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

सामना टाय, सुपर ओव्हर होणार

पाकिस्तानची बॅटिंग

त्याआधी यूएसएने टॉस जिंकून पाकिस्तानला बटिँगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. पाकिस्तानला नवख्या यूएसएसमोर धावांसाठी संघर्ष करावा लागला. मधल्या फळीत कॅप्टन बाबर आझम याने सर्वाधिक 44 आणि शादाब खान याने 40 धावा केल्या. तर अखेरच्या क्षणी शाहिन आफ्रिदी याने नाबाज 23 धावा जोडल्या. तर इफ्तिखार अहमदने 18 तर फखर झमानने 11 धावा केल्या. यूएसएकडून नॉथुश केंजिगे याने 3 आणि सौरभ नेत्रवाळकरने 2 विकेट्स घेतल्या. तर जसदीप सिंह आणि अली खान या दोघांना 1-1 विकेट मिळाली.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर आणि हरिस रौफ.

युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.