USA vs PAK: मुंबईकर सौरभ नेत्रवाळकरने दाखवला मोहम्मद रिझवानला बाहेरचा रस्ता, टेलरकडून अप्रतिम कॅच
Saurabh Netravalkar Dismissed To Mohammad Rizwan: सौरभ नेत्रवाळकरने आपल्या बॉलिंगवर मोहम्मद रिझवान याला 9 धावांवर आऊट केलं. स्टीव्हन टेलरने रिझवानचा अफलातून कॅच घेतला.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 11 व्या सामन्यात यजमान यूएसएने पाकिस्तानला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानकडून कॅप्टन बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान ही सलामी जोडी मैदानात आली. मोहम्मद रिझवान याने सिक्स ठोकून पाकिस्तान आणि स्वत:चं खातं उघडलं. मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या तुलनेत नवख्या असलेल्या यजमान संघांने पाहुण्या टीमला टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम केला. मुंबईकर असलेल्या सौरभ नेत्रवाळकर याने पाकिस्तानच्या डावातील दुसऱ्या आणि आपल्या कोट्यातील पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेतली. सौरभने दुसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर पाकिस्तानला पहिला धक्का दिला.
सौरभने टाकलेला बॉल मोहम्मद रिझवान याच्या बॅटचा कड घेऊन स्लीपच्या दिशेने गेला. तिथे स्टीव्हन टेलर होता. स्टीव्हनने हवेत झेप घेत आधी 2 हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही सेंकदात निर्णय बदलला आणि 1 हाताने अप्रतिम कॅच घेतला. जर्सी नंबर 8 असलेल्या टेलरने अवघ्या 72ते 72 मिनी सेकंदांमध्ये कॅच पूर्ण केला आणि रिझवानला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. रिझवानने 9 धावा केल्या.
स्टीव्हन टेलरचा कडक कॅच
Saurabh Netravalkar, a full time Oracle Corp. employee takes the wicket of one of Pakistan’s finest batsman, Mohd Rizwan.#USAvPak #T20IWC #CricketTwitter
Video: @Cricket_Circle_ pic.twitter.com/mzu5GHPQsE
— Samuel Sudhakar (@gogulla) June 6, 2024
पाकिस्तानचा पावरप्लेमध्ये डब्बागुल
दरम्यान पाकिस्तानची पावरप्लेपर्यंत नाजूक स्थिती झाली. यूएसएने पाकिस्तानला पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये 3 झटके दिले. पाकिस्तानला पावरप्लेमध्ये अवघ्या 5 च्या रनरेटने फक्त 30 धावाच करता आल्या. यूएसएने अशाप्रकारे पावरप्लेमध्ये वर्ल्ड कप विजेत्या संघाविरुद्ध जोरदार सुरुवात करत पाकिस्तानला बॅकफुटवर ढकललं.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर आणि हरिस रौफ.
युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.
