Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचा धक्कादायक व्हिडीओ, मैदानावर अम्पायरला…ती कृती पाहून संताप व्यक्त!
भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असल्याचे दिसतेय. मैदानावर दोन पंच पाकिस्तानी खेळाडूला समजावून सांगत आहेत. पाकिस्तानी खेळाडूने काहीतरी आक्षेप घेतल्याचे दिसतेय. पंचांचा पाकिस्तानी खेळाडूसोबत संवाद सुरू असतानाच मागून वैभव सूर्यवंशी आलेला दिसतोय.

Vaibhav Sooryavanshi : भारताचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीने राइजिंग स्टार्स एशिया कप 2026 स्पर्धेत सर्वांनाच धक्क करून टाकणारी फलंदाजी केलीय. त्याने अवघ्या 53 चेंडूंमध्ये तब्बल 204 धावा केल्या आहेत. त्याच्या या खेळीमुळे क्रिकेट विश्वातील अनेक रेकॉर्ड्स मोडीत निघाले आहेत. दरम्यान, यूएईविरोधातील या सामन्यात वैभव सूर्यवंशीने नेत्रदीपक कामगिरी केलेली असली तरी याआधीच्या सामन्यातील त्याच्या एका कृतीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेलेले नाही.
वैभवने केल्या फक्त 11 धावा
याच स्पर्धेमध्ये भारताचा नुकताच पाकिस्तानविरोधात सामना झाला. या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. 22 नोव्हेंबर रोजी हा सामना पार पडला. यात भारताला पराभव पत्करावा लागला. वैभव सूर्यवंशी फक्त 11 धावा करू शकला. याच सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याने एक कृती केलीय. त्याच्या या कृतीवर काही नेटकरी टीका करतायत. तर काही नेटकऱ्यांनी वैभव सूर्यवंशीला पाठिंबा दिलाय.
व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असल्याचे दिसतेय. मैदानावर दोन पंच पाकिस्तानी खेळाडूला समजावून सांगत आहेत. पाकिस्तानी खेळाडूने काहीतरी आक्षेप घेतल्याचे दिसतेय. पंचांचा पाकिस्तानी खेळाडूसोबत संवाद सुरू असतानाच मागून वैभव सूर्यवंशी आलेला दिसतोय. वैभव अगोदर पंचापासून खूप दूर अंतरावर होता. परंतु पंच पाकिस्तानी खेळाडूशी बोलत असल्याचे दिसताच वैभवने पंचाजवळ जात मागून धक्का दिलाय. त्यामुळे पंच पाकिस्तानी खेळाडूच्या अंगावर ढकलला गेल्याचं दिसतंय.
अनेकांनी केली वैभववर टीका
वैभवच्या याच कृतीवर संमीश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातायत. काही क्रिकेट चाहत्यांनी वैभवची ही कृती योग्य नसल्याचे मत व्यक्त केलेय. तर काही लोकांनी वैभवच्या कृतीचे समर्थन केलेय. वैभवचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय.
यूएईविरोधातील सामन्यात धावांचा पाऊस
दरम्यान, आजच्या यूएईसोबतच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने दमदार फलंदाजी केली. त्याने तब्बल 204 दावा केल्या. वैभवने 53 चेंडूंंमध्ये 7 चौकार आणि 28 षटकार लगावले. त्याच्या या तुफानी खेळीचे अनेकांनी कौतुक केलेय.