AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG | इंग्लंडविरूद्धच्या टेस्ट मॅचवेळी टीम इंडियाच्या स्टार बॉलरचा झटकापटकी निवृत्तीचा निर्णय

IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंड कसोटी मालिका सुरू असताना एका स्टार खेळाडूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूने इंग्लंडचा खेळाडू स्टुअर्ड ब्रॉडचं नाक फोडलं होतं, कोण आहे घातक खेळाडू?

IND vs ENG | इंग्लंडविरूद्धच्या टेस्ट मॅचवेळी टीम इंडियाच्या स्टार बॉलरचा झटकापटकी निवृत्तीचा निर्णय
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 16, 2024 | 6:13 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची मालिका असणार आहे. यामधील आता टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड संघाने विजय मिळवला आहे. आता मालिका 1-1 ने बरोबरीत असून तिसऱ्या सामन्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच टीम इंडियाच्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

कोण आहे तो खेळाडू?

टीम इंडियाचा हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून वरूण अॅरोन आहे.  2008 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या 16 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत वरुण अरुणने 65 सामने खेळले आणि168 विकेट्स घेण्यात त्याने घेतल्या होत्या. देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरीमुळे त्याला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याला जास्त दिवस आंतरराष्ट्रीय संघात आपलं स्थान टिकवत आलं नाही. टीम इंडियाठी फ्कत 9 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने प्रतिनिधित्त्व केलं होतं.

इंग्लंडच्या खेळाडूचं फोडलेलं नाक!

2014 साली टीम इंडियाकडून खेळताना आपल्या बॉलिंगवर त्याने इंग्लंडचा खेळाडू ब्रॉडचं नाक फोडलं होतं. वरूण 150 किलोमीटर वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता होती. त्यामुळे त्याची निवड समितीने दखल घेतली होती. मात्र दुखापतीमुळे संघाच्या बाहे बसावं लागलं होतं.

दरम्यान, 2008 पासून मी रेड बॉल क्रिकेट खेळत आलो आहे. वेगवान गोलंदाजीमुळे मला अनेक दुखापती झाल्या आहेत. मात्र आता मला शरीर साथ देत नसल्याने मी  निवृत्तीचा निर्णय घेत असल्याचं वरूण अॅरोन याने म्हटलं आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...