विजय हजारे ट्रॉफीत डावखुऱ्यांची कमाल, आतापर्यंतची आश्चर्यकारक आकडेवारी

Vijay Hazare Trophy 2025-26: देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत चौथ्या टप्प्याचे सामने पार पडले आहेत. या स्पर्धेत अतितटीचे सामने पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळाली. असं असताना या स्पर्धेत डावखुऱ्या खेळाडूंचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे.

विजय हजारे ट्रॉफीत डावखुऱ्यांची कमाल, आतापर्यंतची आश्चर्यकारक आकडेवारी
विजय हजारे ट्रॉफीत डावखुऱ्यांची कमाल, आतापर्यंतची आश्चर्यकारक आकडेवारी
Image Credit source: INSTAGRAM
| Updated on: Jan 01, 2026 | 6:24 PM

Vijay Hazare Trophy 2025-26: देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी आता प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. आता पाचव्या टप्प्याचे सामने पार पडणार आहेत. असं असताना पुढच्या फेरीत कोण एन्ट्री घेते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण दुसरीकडे, या स्पर्धेत फलंदाजांनी लक्ष वेधून घेतलं आहे. कारण काही सामन्यात धावसंख्या ही 400च्या पारही गेली आहे. यावरून फलंदाजांचा वरचष्मा दिसून येत आहे. पण यातही डावखुऱ्या फलंदाजांचा बोलबाला आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पाच खेळाडूंमध्ये तीन डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश आहे. त्यांच्या खेळीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. कर्नाटकचा डावखुरा सलामी फलंदाज देवदत्त पडिक्कल या स्पर्धेत सर्वात पुढे आहे. त्याने चार सामन्यात 406 धावा ठोकल्यात. यात 147 ही सर्वोत्तम खेळी आहे. त्याची सरासरी 101 आणि स्ट्राईक रेट हा 106च्या आसपास आहे. या दरम्यान पडिक्कलने तीन शतकं ठोकली. शतकांच्या यादीतही सर्वात वर आहे. त्याच्या खेळीमुळे कर्नाटकचा विजयाचा मार्ग सुकर होत आहे.

हिमाचल प्रदेशचा पुखराज मान तिसऱ्या क्रमांकावर आहे. डावखुऱ्या फलंदाजाने आक्रमक फलंदाजी करत क्रीडाप्रेमींची मनं जिंकली आहेत. त्याने चार सामन्यात 360 धावा केल्यात. तसेच दोन शतकं आणि एक अर्धशतक ठोकलं आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 126 आहे आणि स्ट्राईक रेट 100पेक्षा जास्त आहे. पुखराजच्या खेळीमुळे हिमाचल प्रदेशला फायदा होत आहे. रेल्वेजचा रवि सिंह या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने चार सामन्यात 345 धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकं ठोकली आहेत. या स्पर्धेत त्याने 22 षटकार मारले आहेत. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 20हून अधिक षटकार मारता आलेले नाहीत.

पाचव्या फेरीचे सामने कधी?

विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेत चौथ्या फेरीचे सामने पार पडले आहेत. पाचव्या फेरीचे सामने 3 जानेवारीपासून होणार आहेत. या फेरीत काही दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील. विराट कोहली सहाव्या फेरीत खेळणार असल्याचं आधीच स्पष्ट झालं आहे. 6 जानेवारीला बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये रेल्वेविरुद्ध सामना खेळणार आहे. त्याचा या स्पर्धेतील तिसरा सामना असेल. त्याने या स्पर्धेत एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलं आहे. त्यानंतर विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळताना दिसेल.