विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक, पण एका जाहिरातीत दिसणार! मित्राने सर्व काही सांगितलं

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती चिंताजनक आहे. मागच्या काही महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ असल्याने ब्रेन स्टोकची भीती आहे.

विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक, पण एका जाहिरातीत दिसणार! मित्राने सर्व काही सांगितलं
विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक, पण एका जाहिरातीत दिसणार! मित्राने सर्व काही सांगितलं
Image Credit source: Money 9 वरून
| Updated on: Apr 16, 2026 | 9:50 PM

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती गेल्या काही महिन्यात कमालीची ढासळली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना चिंता सतावत आहे. दीड वर्षांपूर्वी त्याला मुंबईत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतीसभा कार्यक्रमात पाहिलं होतं. तेव्हा त्याची अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला होता. कारण त्याला नीट उभंही राहता येत नव्हतं. आधारासाठी त्याला सचिन तेंडुलकरचा आधार घ्यावा लागला होता. असं असताना त्याच्या प्रकृतीबाबत एक बातमी समोर आली आणि धाकधूक वाढली . कारण त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ तयार झाली आहे आणि त्यामुळे त्याच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यात त्याला ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याचं बोललं जात आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, विनोद कांबळीच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा सुधारणा झाली आहे. पण काळजी घेण्याचं कारण आहे. सध्याच्या त्याचा रिपोर्टवरून डॉक्टरांनी पुढचा अंदाज बांधला आहे. मेंदूत रक्ताची गाठ झाल्याने त्याला ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याचं सांगितलं आहे. डॉक्टरांच्या मते, त्याच्या मेंदूतील रक्ताची गाठ आता काढणं शक्य नाही. कारण अशा स्थितीत सुरूवातीलाच काळजी घेणं गरजेचं असते. त्यामुळे विनोद कांबळीला भविष्यात ब्रेन स्ट्रोक येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विनोद कांबळीचा मित्र आणि माजी बीसीसीआय पंच मार्कस कूटो यांनी सांगितलं की, मी त्याच्या मित्रांना एकत्रिक करून एक व्हॉट्सएप ग्रुप तयार केला आहे. मित्रही नाव न सांगता मदत करत आहे. त्याची स्मरणशक्ती चांगली नाही. मागच्या सहा महिन्यात त्यात काही सुधारणा झालेली नाही. त्याला फार काही आठवत नाही. पण जेव्हा काही आठवतं तेव्हा त्यावर बोलतो. नाही तर त्याच्यासाठी काही आठवणं कठीण होतं. विनोदच्या मेंदूत रक्ताची गाठ आहे आणि ती काढणं कठीण आहे. डॉक्टरांनी त्याला ब्रेन स्ट्रोक येण्याची शक्यता वर्तवली आहे. असं असताना या वर्षाच्या शेवटी विनोद कांबळी स्क्रिनवर दिसणार आहे, असं कूटो यांनी सांगितलं.

कूटो यांनी सांगितलं की, “त्याला दिनशॉ आईस्क्रीमच्या जाहिरातीची ऑफर आली होती. त्याने गेल्या आठवड्यात माहीममध्ये त्याचे चित्रीकरण केले. जाहिरात उत्तम बनवली आहे आणि लोकांना ती आवडेल. विनोदकडून त्यांना नक्की काय हवे आहे हे त्यांना अचूक माहीत होते. त्याच्या वयानुसार ती भूमिका अगदी योग्य होती. त्यांना त्याच्याकडून नक्की काय हवे आहे हे त्यांना माहीत होते. त्यांनी ते सोपे आणि वास्तववादी ठेवले.”

विनोद कांबळीची काळजी त्याची पत्नी अँड्रिया घेते, असंही कूटो याने पुढे सांगितलं. विनोद त्याचा अधिकांश वेळ घरीच घालवतो आणि कुटुंबासोबत राहणं पसंत करतो. टीव्ही वगैरे पाहात नाही आणि दोन मुलांसबोत खेळून वेळ घालवतो. पण स्मरणशक्ती कमकुवत झाल्याने तो वेळेवर औषधं घेणंही विसरतो. पण त्याच्या त्याच्या चालण्याच्या क्षमतेतही लक्षणीय सुधारणा झाली आहे. .

Follow Us