शुबमन गिलने सारा तेंडुलकरची गळाभेट घेतली? व्हायरल फोटोमागचं सत्य जाणून घ्या

Shubman Gill Viral Photo Truth : शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. नुकतंच दोघेही लंडनमधील एका कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. आता एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चला जाणून घेऊयात त्यामागचं सत्य

शुबमन गिलने सारा तेंडुलकरची गळाभेट घेतली? व्हायरल फोटोमागचं सत्य जाणून घ्या
शुबमन गिलने सारा तेंडुलकरची गळाभेट घेतली? व्हायरल फोटोमागचं सत्य जाणून घ्या
Image Credit source: pti/instagram
| Updated on: Jul 21, 2025 | 6:36 PM

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत भारताची स्थिती करो या मरोची आहे. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वाची कसोटी चौथ्या सामन्यात लागणार आहे. असं असताना शुबमन गिलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत शुबमन गिल एका मुलीची गळाभेट घेताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनेक तर्क लावले जात आहे. अनेकांनी या फोटोखाली प्रतिक्रिया देताना ती मुलगी सारा तेंडुलकर असल्याचं सांगितलं आहे. पण यात काही तथ्य नाही. तुम्हाला असाच भ्रम झाला असेल तर त्या फोटो मागचं तथ्य तुम्हाला सांगतो.

शुबमन गिलने सारा तेंडुलकरची गळाभेट घेतलेल्या फोटो तथ्य नाही. कारण शुबमन गिलने सारा तेंडुलकर नाही तर हेजल कीचशी भेट घेतली होती. हेजल कीच युवराज सिंह याची पत्नी आहे. इंग्लंडमध्ये एका कार्यक्रमात दोघांची भेट झाली होती. हा कार्यक्रम युवराज सिंगच्या युवीकॅन फाउंडेशनचा होता. या कार्यक्रमाला भारतीय क्रिकेट संघाने हजेरी लावली होती. तर सचिन तेंडुलकरसह पत्नी अंजली आणि मुलगी साराही या कार्यक्रमात होती. त्यामुळे या फोटोला वेगळाच रंग देण्यात आला. पण यात काही तथ्य नाही.

सारा तेंडुलकर सध्या फ्रान्समध्ये आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर सारा तेंडुलकर आपल्या मित्रांसह फ्रान्स गेली होती. तिथे काही दिवस तिने मुक्का साधला. यावेळी तिने पेंट ट्रॉपेजसह काही प्रसिद्ध ठिकाणी भेट दिली. इतकंच काय तर पार्टीत देखील सहभागी झाली. दुसरीकडे, शुबमन गिल इंग्लंड दौऱ्यातील उर्वरित दोन सामन्यांसाठी तयारी करत आहे. चौथ्या सामन्यात भारताची करो या मरोची स्थिती आहे. भारताला हा सामना जिंकावाच लागेल किंवा ड्रॉ करून मरण पाचव्या सामन्यावर ढकलावं लागेल. शुबमन गिलने या मालिकेत 607 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि एक द्विशतकाचा सामावेश आहे.