AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तान संघ मालक कामिल खानने पुढचं सांगून टाकलं, बाद फेरीत…

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानची चांगलाच दणका दिला. सामन्याच्या एक दिवस आधी भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा दहशतवादावरून नाचक्की झाली आहे.

भारताचा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तान संघ मालक कामिल खानने पुढचं सांगून टाकलं, बाद फेरीत...
भारताचा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तान संघ मालक कामिल खानने पुढचं सांगून टाकलं, बाद फेरीत...Image Credit source: World Championship Of Legends Twitter
| Updated on: Jul 21, 2025 | 4:15 PM
Share

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 ही माजी क्रिकेटपटूंसाठी एक टी20 स्पर्धा असून यंदाचं दुसरं पर्व आहे. या स्पर्धेत भारत चॅम्पियन, पाकिस्तान चॅम्पियन, इंग्लंड चॅम्पियन, ऑस्ट्रेलिया चॅम्पियन, वेस्ट इंडिज चॅम्पियन आणि दक्षिण आफ्रिका चॅम्पियन हे सहा संघ सहभागी होतात. रविवार 20 जुलै रोजी इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात सामना होणार होता. पण इंडिया चॅम्पियन्सचे खेळाडू इरफान पठाण, हरभजन सिंग, युसूफ पठाण, सुरेश रैना आणि शिखर धवन यांनी पाकिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. या निर्णयामुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली आहे. दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून जगभर प्रतिमा आहे. ऑपरेशन सिंदुरनंतर उड्या मारणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सामना अचानक रद्द केल्याबद्दल संताप व्यक्त केला.भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचे नसते , तर त्यांनी संघ येण्यापूर्वीच ते नाकारायला हवे होते , असं त्यांने सांगितलं.

पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचे मालक कामिल खान म्हणाले की, ‘वर्ल्ड चॅम्पियन्सशिप लीजेंड्स स्पर्धेचे इतर सामने वेळापत्रकानुसार सुरू राहतील . भविष्यात कोणतेही बदल होणार नाहीत . जर दोन्ही संघ बाद फेरीत एकमेकांसमोर आले तर आयोजकांकडून एक नवीन योजना आखली जाईल. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीबाबत सांगायचं तर उपांत्य फेरीत चार संघ असतील. तिथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना टाळता येईल. पण जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर पुन्हा समस्या निर्माण होतील.’ कामिल खानच्या या विधानानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या आयोजकांसाठी एक नवीन चिंता सुरू झाली आहे.

पहिल्या पर्वात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट आणि 5 चेंडू राखून मात दिली होती. तसेच जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे भारताने एकदा पाकिस्तानला अंतिम फेरीत दणका दिला आहे. पाकिस्तानने 20 षटकात 6 गडी गमवून 156 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 157 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 19.1 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. भारताकडून अंबाती रायुडूने 30 चेंडूत 50 धावांची खेळी केली होती. तसेच युसूफ पठाणने 16 चेंडूत 3 षटकार आणि एक चौकार मारत 30 धावा केल्या होत्या.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.