AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs pakistan: ‘सामन्यानंतर विराटने पाकिस्तानच्या खेळाडूंना मिठी मारली, म्हणून त्यालाही अटक करणार का?,’ ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा सवाल

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून 10 विकेट्सनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर अनेक चर्चांना उधान आलं आहे.

India vs pakistan: 'सामन्यानंतर विराटने पाकिस्तानच्या खेळाडूंना मिठी मारली, म्हणून त्यालाही अटक करणार का?,' ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा सवाल
विराट आणि रिजवान
| Edited By: | Updated on: Oct 28, 2021 | 5:15 PM
Share

दुबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी एकतर्फी लढाई पाहायला मिळाली. हा सामना पाकिस्तानने अगदी सहज खिशात घातला. संपूर्ण भारतभर हा सामना मोठ्या उत्साहात पाहिला गेला. भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला पण हा सामना अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. त्यातीलच एक म्हणजे पाकिस्तानच्या विजयानंतर भारतात काही ठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला, तर काहींनी सोशल मीडियावर पाकिस्तानचं अभिनंदन केलं. त्यामुळे अशा व्यक्तींवर मानवतावादी आधारावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली (Unlawful Activities Prevention Act) कारवाई करण्यात आली. दरम्यान भारताचा कर्णधार विराटने देखील सामना होताच मैदानात अभिनंदन करताना पाकचा खेळाडू रिजवानला मिठी मारली, मग आचा त्यालाही अटक करणार का?, असा प्रश्न राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान या भव्य सामन्यानंतर  सोशल मीडियावर विविध मीम्स आणि दिग्गजांच्या कमेंट्स येतच आहेत. अशावेळी विराटचं सामन्यानंतरचं मैदानातील खेळाडू वृत्तीने वागणं अनेकांना आवडलं आहे. पण एकीकडे पाकच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत असताना आता विराटच्या वागण्यावरही कारवाई होणार का? असा प्रश्न नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत हा प्रश्न विचारला आहे.

असा पार पडला सामना

सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.

त्यानंतर 152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला.

इतर बातम्या

पाकिस्तानच्या क्रिकेट संघात 3 खेळाडू कोरोनाबाधित, क्रिकेट बोर्डाने दिली माहिती

T20 World Cup 2021 मध्ये ‘या’ गोलंदाजांचा जलवा, भारताचे शेजारी करत आहेत धमाल!

India vs New zealand: झहीर खानचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला, सांगितली न्यूझीलंड संघाची खरी ताकद

(Virat hugs pakistani players so will he get arrested for being happy in pakistan win asks nitin raut)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.