
Virat Kohli-Shreyas Iyer-Rohit Sharma Viral Video: भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन सामन्यांची एकदिवशीय मालिका आता रोमांचक स्थितीत पोहचली आहे. पहिला एकदिवशीय सामना भारताने खिशात घातला. तर दुसर्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. आता तिसरा आणि निर्णायक सामना 18 जानेवारी रोजी इंदूर येथे खेळला जाणार आहे. दरम्यान एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा श्रेयस अय्यर याच्या चालण्याची नक्कल करताना दिसतो. या दोघांचे मागे कर्णधार रोहित शर्मा हे दृश्य पाहताच खळखळून हसला. त्यावेळी चाहत्यांनी सुद्धा भरभरून दाद दिली. तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याची एकच चर्चा सुरू आहे.
सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया
हा व्हिडिओ अनेक प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक ठिकाणी हा व्हिडिओ शेअर झाला आहे. या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
एका चाहत्याने लिहिले आहे की, हा तर सरपंच साहेबांचा स्वॅग आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, विराट हा असाच आहे, तो काही सुधारणार नाही. विराटने आता मिमिक्रीचा क्लास सुरु करावा.
तर एकाने लिहिले आहे की, काही दिवसांपूर्वी तर श्रेयस ऐवजी रोहित पुढे होता आणि त्यावेळी सुद्धा असंच काहीसं झालं होते. कोहलीने हे सिद्ध केलंय की तो ऑलराऊंडर आहे.
तर एका फॅनने हा व्हिडिओ अत्यंत क्यूट असल्याचे म्हटलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. चाहते या व्हिडिओला लाईक करत आहेत. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.
मैदानावर विराट, ड्रेसिंग रुममध्ये कूल
विराट कोहली हा क्रिकेटच्या मैदानावर अत्यंत आक्रमक असतो. तो आक्रमक पद्धतीने खेळतो. पण ड्रेसिंग रुम आणि मैदानावर मात्र तो अत्यंत कूल दिसून येतो. त्याची फिरकी घेण्याची सवय दिसून येतो. तो वातावरण कूल ठेवण्याचं आणि सहकाऱ्यांशी थट्टा विनोद करताना दिसून येतो. सामना सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. तो वातावरण हलकं-फुलकं करताना दिसून येतो. त्याच्या याव्हिडिओमुळे सहकाऱ्यांमधील टीम स्पिरिट तर कायम राहतंच पण एक खास बाँडिंग पण तयार होतं. तर त्याचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर मनोरंजन करतात. सध्या हा व्हिडिओ असाच धुमाकूळ घालत आहे.