Virat Kohli, Asia Cup 2022 : विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध करणार हा विक्रम, 28 ऑगस्टला शानदार सामना

| Updated on: Aug 10, 2022 | 7:23 AM

Asia Cup 2022 : 33 वर्षीय विराट कोहलीनं टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 99 सामन्यांच्या 91 डावांमध्ये 50 च्या सरासरीने 3308 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. याविषयी अधिक जाणून घ्या...

Virat Kohli, Asia Cup 2022 : विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध करणार हा विक्रम, 28 ऑगस्टला शानदार सामना
विराट कोहली
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : विराट कोहली हा(Virat Kohli) गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 (T-20) मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली होती. भारतीय संघाने ही मालिका 4-1 ने जिंकली. आता भारतीय खेळाडू T20 आशिया चषक (Asia Cup Cricket 2022) कपमध्ये प्रवेश करतील. या स्पर्धेसाठी कोहलीला 15 जणांच्या संघातही स्थान मिळाले आहे. येथे संघाला पाकिस्तानविरुद्धही सामना खेळायचा आहे. याआधी झिम्बाब्वेचा दौरा झाला असला तरी तिथे फक्त एकदिवसीय सामने होणार आहेत आणि त्यासाठी शिखर धवनच्या नेतृत्वाखालील युवा संघाला संधी मिळाली आहे. आशिया चषकाबाबत बोलायचं झालं तर भारत आणि पाकिस्तान गट फेरीत 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने येणार आहेत. त्याचवेळी 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यात कोहलीला संधी मिळाल्यास तो विशेष शतक झळकावेल. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हा त्याचा 100 वा सामना असेल. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरणार आहे. कर्णधार रोहित शर्माने 132 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे…

  1. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्यात विराट कोहली अव्वल
  2. विराटने 7 सामन्यात 78 च्या सरासरीने 311 धावा केल्या आहेत.
  3. पाकिस्तानविरुद्ध 3 अर्धशतके केली आहेत. स्ट्राइक रेट 118 आहे.
  4. इतर कोणत्याही भारतीयाला 200 धावांचा टप्पाही गाठता आला नाही.

सर्वाधिक धावा करणाऱ्यात तिसरा

वर्षीय विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 99 सामन्यांच्या 91 डावांमध्ये 50 च्या सरासरीने 3308 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 30 अर्धशतके केली आहेत. नाबाद 94 धावांची सर्वोत्तम खेळी. स्ट्राइक रेट 138 आहे. त्याच्या एकूण T20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 344 सामन्यांच्या 327 डावांमध्ये 40 च्या सरासरीने 10626 धावा केल्या आहेत. त्याने 5 शतके आणि 78 अर्धशतके केली आहेत. म्हणजेच 83 वेळा त्याने 50 पेक्षा जास्त धावांची इनिंग खेळली आहे. 113 धावांची सर्वोत्तम खेळी.

पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरी

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाबद्दल बोलायचं तर विराट कोहली येथे अव्वल स्थानावर आहे. त्याने 7 सामन्यात 78 च्या सरासरीने 311 धावा केल्या आहेत. 3 अर्धशतके केली आहेत. स्ट्राइक रेट 118 आहे. इतर कोणत्याही भारतीयाला 200 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. युवराज सिंगने 8 सामन्यात 155 धावा केल्या आहेत तर गौतम गंभीरने 5 सामन्यात 139 धावा केल्या आहेत. इतर कोणालाही 100 धावाही गाठता आल्या नाहीत. रोहितने 8 सामन्यांच्या 7 डावात 70 धावा केल्या आहेत. 30 नाबाद सर्वोत्तम आहे. त्याचवेळी केएल राहुलने एका सामन्यात 3 धावा केल्या आहेत.