आयला, अरे हा तर छोटा चिकू; डुप्लिकेट विराट कोहलीची चर्चा, व्हायरल Video पाहिला का?

Virat Kohli duplicate Chhota Cheeku viral Video: या छोट्या चिकूने तर सर्वांची मनं जिंकली आहे. विराटसारखा दिसणाऱ्या या चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कुठला आहे हा मुलगा, कुठे झाली त्याची विराटसोबत भेट?

आयला, अरे हा तर छोटा चिकू; डुप्लिकेट विराट कोहलीची चर्चा, व्हायरल Video पाहिला का?
विराट कोहली, मिनी विराट
Image Credit source: गुगल
| Updated on: Jan 13, 2026 | 2:41 PM

Virat Kohli duplicate Chhota Cheeku viral Video: न्यूझीलंडविरोधात बडोद्यात विराटची बॅट चांगलीच तळपळली आहे. या एकदिवशीय सामन्यात दमदार फलंदाजीसह विराट अजून एका चर्चेमुळे प्रकाशझोतात आला.कोहली हा सामना खेळण्यापूर्वी त्याच्या काही चाहत्यांना भेटला. सराव करण्यासाठी तो मैदानावर उतरला होता. त्यावेळी त्याची भेट एका लहानग्या चाहत्याशी झाली. या दोघांचे फोटो इंटरनेटवर एकदम व्हायरल झाले. कारण या लहान चाहत्याचा चेहरा विराट कोहलीच्या लहानपणीच्या चेहऱ्याशी एकदम मिळताजुळता आहे. जणू हा लहानपणीचा डुप्लिकेट विराटच आहे. विराटला चिक्कू या टोपणनावाने ओळखतात. तेव्हा अनेकांनी हा डुप्लिकेट चिकू असल्याचे कौतुक केले. त्याला पाहून विराट कोहली पण आश्चर्यचकीत झाला. त्याला लहानपण आठवले.

छोट्या चिकूशी संवाद

या छोट्या मुलाने विराट कोहलीला आवाज दिला. तेव्हा विराटने त्याला थांबण्याचा इशारा केला. ‘अरे तिकडे पाहा, माझा डुप्लिकेट’असा त्याने सहकारी रोहित शर्माला आवाज दिला. कोहलीने या छोट्या विराटची भेट घेतली. त्याच्याशी संवाद साधला. त्यावेळी विराट त्याला छोटा चिकू म्हणाला. त्याने या छोट्या मुलाची आस्थेनी चौकशी केली. त्याच्यासोबत फोटोही काढला. आता हा छोटा फॅन एखाद्या सेलेब्रिटीसारखा प्रसिद्ध झाला.

मिनी विराटची हवा

सोशल मीडियावर या चाहत्याचे मिनी विराट असे नामकरण सुद्धा झाले. विराट कोहलीने सुद्धा आपल्याला चिकू म्हटल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या मिनी विराटने त्याची विराट कोहलीसोबत काय चर्चा झाली याची माहिती दिली. एका मुलाखतीत त्याला विचारण्यात आले की, विराट कोहलीबाबत तुला कोणती गोष्ट सर्वाधिक आवडते? तेव्हा त्याच्या या लिटिल फॅनने उत्तर दिले की, विराटची स्टाईल आणि ऑरा आपल्याला अधिक आवडतो. ज्यावेळी आपण विराट कोहली यांना आवाज दिला, तेव्हा त्यांनी मला हाय म्हटले आणि मी थोड्याच वेळात येऊन भेटतो असे म्हटल्याचे या मिनी विराटने सांगितले.

तर त्याने पुढील किस्साही सांगितला. विराट कोहली यांनी रोहित शर्मा यांना माझा लहानपणीचा डुप्लिकेट पाहा, असे सांगितल्याचे या छोट्या मुलाने माहिती दिली. छोटा चिकू म्हटल्याने मला आनंद झाल्याचा हा चिमुकला म्हणाला. यावेळी या छोट्या विराटची भेट केएल राहुल, अर्शदीप सिंह, रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंसोबत झाली. बडोद्यात कोहलीने 93 धावांची खेळी खेळत टीम इंडियाला विजयी करण्यात मोलाची भूमिका निभावली.