AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्या मनाचा विराट कोहली! ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मागितली ती खास गोष्ट, भावाने देऊन टाकली, पाहा Video

विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोहली कांगारूंच्या खेळाडूंनी काहीतरी देत असल्याचं दिसत आहे.

मोठ्या मनाचा विराट कोहली! ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मागितली ती खास गोष्ट, भावाने देऊन टाकली, पाहा Video
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 13, 2023 | 8:07 PM
Share

मुंबई : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी चौथा कसोटी सामना खास ठरला. या सामन्यामध्ये विराट कोहलीने 186 धावांची दमदार खेळी करत भारताला मजबूत स्थितीत पोहोचवलं होतं. हा सामना अनिर्णित राहिला तरीसुद्धा विराटने केलेली खेळी महत्त्वाची ठरली. तर भारताने सलग चौथ्यांदा कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.  प्लेअर ऑफ द मॅच ने विराटला गौरवण्यात आलं. अशातच कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोहली कांगारूंच्या खेळाडूंनी काहीतरी देत असल्याचं दिसत आहे.

कसोटी संपल्यानंतर दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी विराट कोहलीला त्याची टेस्ट जर्सी मागितली आणि विराटनेही मोठ्या मनाने त्यांना ती जर्सी भेट दिली. डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजा आणि यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरी यांनी विराट कोहलीची भेट घेतली होती. बीसीसीआयने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

अहमदाबाद कसोटीत विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. विराट कोहलीने 1205 दिवसांनी कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकवलं. इतकंच नाही तर 40 महिन्यांनंतर विराट कोहलीला कसोटीत सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. विराटने आपल्या नावावर एक रेकॉर्ड केला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 10 किंवा त्याहून अधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणारा विराट कोहली एकमेव खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये 38 वेळा आणि टी-20मध्ये 15 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिल्या डावात 480 धावा केल्या. टीम इंडियाने या प्रत्युत्तरात 571 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 91 धावांची आघाडी मिळाली. मात्र सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने अखेरपर्यंत बॅटिंग करत सामना ड्रा केला. यासह टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा बॉर्जर गावसकर ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाने या मालिकेत 2-1 अशा फरकाने ही मालिका जिंकली आहे. टीम इंडियाचा हा घरातला सलग 16 वा मालिका विजय ठरला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?