Video : विराट कोहलीचा सिक्स, बुमराहचा यॉर्कर, आशिया कपआधी टीम इंडियाची जोरदार तयारी!

Team India Practice Session : कर्नाटकमध्ये टीम इंडियाचं सराव सुरू आहे, गेल्या सहा दिवसांपासून हे सराव शिबिर सुरू असून आज मुख्य खेळाडू कोहली, बुमराह आणि अय्यर यांनी कसून सराव केला.

Video : विराट कोहलीचा सिक्स, बुमराहचा यॉर्कर, आशिया कपआधी टीम इंडियाची जोरदार तयारी!
Virat Kohli
Image Credit source: AFP
| Updated on: Aug 29, 2023 | 11:03 PM

मुंबई : आशिया कप 2023 साठी टीम इंडियाच जोरदार तयारी सुरू आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी सराव शिबिरामध्ये घाम गाळला, 24 ऑगस्टपासून कर्नाटकमधील अलूर येथे सहा दिवसीय सराव शिबिर आहे. या सराव शिबिरामध्ये मुख्य खेळाडूंनी चांगलाच सराव केला. या सराव शिबिराचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

पाहा व्हिडीओ:-

 

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने सरावात दमदार बॅटींग केली. विराटने आक्रमक फटकेही खेळले ज्यावरून स्पष्ट दिसत होतं की कोहली फॉर्ममध्ये आहे. आयर्लंड दौऱ्यावरून परतलेल्या यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहनेही घाम गाळला.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुखापतीतून सावरत असलेला श्रेयस अय्यरनेही मोठे फटके खेळले. यावरून एक गोष्ट दिसून आली की श्रेयस अय्यर आता चौथ्या क्रमांकासाठी फिक्स आहे.  के.एल. राहुल दुखापतीमुळे आशिया कपमधील दोन सामने खेळू शकणार नाही.  मात्र सरावावेळी राहुल कीपिंग करताना दिसला यावरून एक लक्षात येतं की वर्ल्ड कप साठी खेळाडूंना आता जास्त दबाव येऊ देत नाही.

आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).

आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.