Virat Kohli, Jonny Bairstow : दोन चित्रं, दोन लोक आणि विराट कोहलीची घेतलेली मजा, पाहा व्हिडीओ

जॉनी बेअरस्टो पहिल्या डावात फलंदाजी करत होता. त्यावेळी त्याचा कोहलीसोबत वाद झाला होता. तोपर्यंत बेअरस्टो क्रीझवर आपलं पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण, कोहलीशी वाद झाल्यानंतर त्यानं आपला गियर बदलला आणि झटपट शतक झळकावल.

Virat Kohli, Jonny Bairstow : दोन चित्रं, दोन लोक आणि विराट कोहलीची घेतलेली मजा, पाहा व्हिडीओ
विराट कोहलीची मजा घेतलेली
Image Credit source: twitter
| Updated on: Jul 06, 2022 | 6:55 AM

नवी दिल्ली : एजबॅस्टन येथे खेळली गेलेली भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाचवी कसोटी अत्यंत रोमांचकारी पद्धतीनं संपली. या सामन्यात यजमान इंग्लंडनं भारतावर 7 विकेट्सनं मात करत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. पाचव्या दिवसापर्यंत पोहोचलेल्या या सामन्यात कधी भारताचा तर कधी इंग्लंडचा वरचष्मा होता. यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाचीही झाली. विशेषतः विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यातील वाद खूप चर्चेत होता. भारताविरुद्धच्या या सामन्यातील दोन्ही डावात शतके झळकावून बेअरस्टो (Jonny Bairstow) चर्चेत आला नाही, तर कोहलीसोबतच्या मैदानावरील वादामुळेही तो चर्चेत राहिला. आता सामना संपल्यानंतर इंग्लंड क्रिकेटनं या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये कॅप्शन नाही. पण,  यातून विराट कोहलीची (Virat Kohli) खिल्ली उडवली आहे.

ईसीबीचं ट्विट

केवळ ईसीबीच नाही, तर इंग्लंड क्रिकेटचा चाहता वर्ग असलेल्या बर्मी आर्मीनंही विराट कोहलीची खिल्ली उडवली. आपल्या ट्विटमध्ये बर्मी आर्मीनं विराटबद्दल म्हटले आहे की, जॉनी बेअरस्टोनं गेल्या 25 दिवसांत जितक्या धावा केल्या, त्या विराट कोहली 18 महिन्यांत करू शकला. बर्मी आर्मीने या ट्विटद्वारे विराटच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बर्मी आर्मीनंही विराट कोहलीची खिल्ली उडवली

वाद कधी झाला?

जेव्हा जॉनी बेअरस्टो पहिल्या डावात फलंदाजी करत होता. त्यावेळी त्याचा कोहलीसोबत वाद झाला होता. तोपर्यंत बेअरस्टो क्रीझवर आपलं पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण, कोहलीशी वाद झाल्यानंतर त्यानं आपला गियर बदलला आणि झटपट शतक झळकावल. बेअरस्टोच्या या शतकामुळे इंग्लंडचा संघ 284 धावांपर्यंत पोहोचला.

वर्तणुकीवरही टीका

कोहलीच्या बेअरस्टोसोबतच्या वर्तणुकीवरही बरीच टीका झाली होती आणि सोशल मीडियावर असेही बोललं जात आहे की जर कोहलीनं इंग्लंडच्या फलंदाजाला चिथावणी दिली नसती तर निकाल वेगळा असू शकला असता. मात्र, बेअरस्टो सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे, असं म्हणणं निरर्थक ठरेल. अशा परिस्थितीत त्याला रोखणे हे कोणत्याही गोलंदाजासाठी आव्हानापेक्षा कमी नाही.

केवळ बेअरस्टोसोबतच नाही तर चौथ्या डावात अ‍ॅलेक्स लीस बाद झाल्यानंतर कोहलीने अतिशय आक्रमक पद्धतीनं सेलिब्रेशन केलं. ज्याला अनेकांनी अनावश्यक म्हटलं होतं.

काल भारतानं पहिल्या डावात ऋषभ आणि रवींद्र जडेजाच्या शतकांच्या जोरावर 416 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तरात इंग्लंडनं 284 धावा केल्या आणि पाहुण्या संघाला 132 धावांची आघाडी मिळाली. भारतीय संघ त्यांच्या दुसऱ्या डावात केवळ 245 धावाच करू शकला, त्यामुळे इंग्लंडला चौथ्या डावात 378 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 7 विकेट्स शिल्लक असताना पूर्ण केले.