
आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली फॉर्मात आहे. आरसीबी संघ प्लेऑफच्या वेशीवर आहे. एका विजयानंतर प्लेऑफमध्ये उडी घेणार आहे. 18व्या पर्वात 18 क्रमांकाची जर्सी घालणारा विराट कोहली कप मिळवून देईल अशी आशा आहे. असं असताना विराट कोहलीची एक गोष्ट चाहत्यांच्या पटकन लक्षात आणि सोशल मीडियावर वणवा पेटला. विराट कोहलीच्या फोटोला अनेक जण लाईक करतात पण त्याने एखाद्याच्या फोटोला लाईक करणं म्हणजे चर्चा तर होणारच ना…1 मे रोजी अभिनेत्री अनुष्का शर्मा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी हे अक्रित घडलं. विराट कोहलीने अभिनेत्री अवनीत कौरच्या फोटोला लाईक केलं. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर धडाधड कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला. त्यानंतर विराट कोहलीने त्या फोटोला डिस्लाइकही केलं. पण हे प्रकरण काही शांत झालं नाही. मग काय रनमशिन विराट कोहलीला त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं.
आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यावर स्पष्टीकरण देत लिहिलं की, ‘मी हे स्पष्टीकरण देऊ इच्छितो की, मी जाणीवपूर्वक त्या फोटोला लाईक केलं नाही. जे काही घडलं ते चुकून झालं होतं. यासाठी मी सर्वांना विनंती करतोी याबाबत कोणताही गैरसमज पसरवू नका. मला समजून घेण्याबाबत सर्वांचे धन्यवाद.’ विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही सर्वात चर्चित जोडी आहे. या दोघांचा शॉर्टमध्ये विरुष्का असं संबोधलं जातं. या दोघांची केमिस्ट्री मैदानात अनेकदा प्रेक्षकांनी पाहिली आहे.
विराट कोहलीचं स्पष्टीकरण
अभिनेत्री अवनीत कौरने 30 एप्रिलला इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले होते. यात शॉर्ट स्कर्टसह हिरव्या रंगाचा टॉप परिधान केला होता. तिच्या चाहत्यांनी या फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता. अनेकांनी या फोटोला हार्ट असलेला इमोजी टाकला. पण विराट कोहलीने या फोटोला लाईक करताच चर्चांना उधाण आलं. कारण या दिवशी अनुष्काचा वाढदिवस होता. चाहत्यांनी लगेचच विराट कोहलीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र याबाबत वेगळ्या चर्चांना फाटा फुटल्याने अखेर त्याला स्पष्टीकरण द्याव लागलं.