AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीचं डोकं पहिल्यासारखे राहिलं नाही, मी भेटलो तेव्हा…! दिनेश कार्तिकच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

विराट कोहली आता फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळणार असल्याने त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा क्रीडाप्रेमींना लागून आहे. त्याने नुकतेच फिटनेस टेस्टही पास केली. मात्र माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक विराटबाबत एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

विराट कोहलीचं डोकं पहिल्यासारखे राहिलं नाही, मी भेटलो तेव्हा...! दिनेश कार्तिकच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
विराट कोहलीचं डोकं पहिल्यासारखे राहिलं नाही, मी भेटलो तेव्हा...! दिनेश कार्तिकच्या वक्तव्याने चर्चांना उधाणImage Credit source: PTI
| Updated on: Sep 09, 2025 | 5:16 PM
Share

विराट कोहली भारतीय क्रिकेट विश्वातील मोठं नाव.. टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्याने आशिया कप स्पर्धेत दिसणार नाही. मात्र वनडे फॉर्मेटमध्ये त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा लागून आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी खेळाडूंची फिटनेस टेस्ट पार पडली. त्यातही विराट कोहली पास झाला. त्यामुळे वनडे मालिकेत खेळताना दिसेल अशी आशा आहे. असं असताना माजी क्रिकेट दिनेश कार्तिकने विराट कोहलीबाबत आश्चर्यकार वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नव्या चर्चांना पेव फुटलं आहे. विराट कोहली शरीराने तर फिट आहे, पण त्याचं डोकं पहिल्यासारखं राहिलं नाही, या विधानामुळे चर्चा तर होणारच ना.. दिनेश कार्तिकने असं का सांगितलं? नेमकं काय झालं? असे एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. विराट कोहली सध्या इंग्लंडमध्ये आहे आणि वनडे फॉर्मेटमध्ये खेळताना दिसणार आहे.

दिनेश कार्तिकने इंडिया टुडेच्या कान्क्लेवमध्ये सांगितलं की, निश्चित आता एक फॉर्मेट खेळत असेल पण आजही शारीरिकदृष्ट्या फिट आहे. तो एक असा खेळाडू आहे त्याच्या जीवनात येणारे सर्व अडथले झेलण्याची ताकद ठेवतो. विराट कोहली देशातील तरूणाईचा रोल मॉडेल आहे, असंही दिनेश कार्तिक म्हणाला. त्याने आक्रमकता फक्त आक्रमकतेचा देखावा केला नाही, तर त्याने आपली प्रतिभाही सिद्ध करून दाखवली. कोणत्याही फॉर्मेटमध्ये विराटने बॅटने काम करून दाखवलं आहे. त्याच्या कामगिरीत सातत्य दिसून आले आहे. दिनेश कार्तिक पुढे म्हणाला की, मी विराट कोहलीसोबत बराच वेळ घालवला आहे. म्हणून मी सांगू शकतो की तो मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे.

विराट कोहलीच्या फिटनेसबाबत दिनेश कार्तिकला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने विराटला इंग्लंड भेटल्यानंतर काही गोष्टी शेअर केल्या. दिनेश कार्तिक म्हणाला की, विराट कोहली खूप आनंदी आहे. आपण त्याने घेतलेल्या निर्णयाचा आदर केला पाहीजे. विराटचे शरीर अजूनही फिटच आहे. पण त्याचं डोकं पहिल्यासारख राहिलेलं नाही. पण त्याला आता कळलं की काय करायला हवं तर त्याच्या निर्णयाचा आदर करायला पाहीजे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...