Asia Cup 2025 : संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल की नाही? सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलं की…
आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात झाली असून पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होत आहे. असं असताना या सामन्यापूर्वी आठही संघांच्या कर्णधारांचं ट्रॉफीसोबत फोटोसेशन पार पडलं. यावेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवा संजू सॅमसनबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा सूर्यकुमार यादव म्हणाला की...

आशिया कप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून महिनाभर जेतेपदाचा मान मिळवण्यासाठी जयपराजयाचं गणित सुरु होणार आहे. या स्पर्धेतला पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होत आहे. तर 10 सप्टेंबरला भारताचा सामना युएईशी होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच भारताच्या प्लेइंग 11 बाबत खलबतं सुरु झाली आहे. भारतीय संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असल्याने कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा ओपनिंग करणार अशी चर्चा असल्याने संजू सॅमसनचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मधल्या फळीत खेळणार की तिथेही विकेटकीपर बॅट्समन जितेश शर्माला संधी मिळणार असा प्रश्न आहे. त्यामुळे संजू सॅमसनच्या चाहत्यांना धाकधूक लागून आहे. संजू सॅमसन प्लेइंग 11 मध्ये असेल की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं की, त्याची काळजी घेतली जात आहे.
सूर्यकुमार यादवला पत्रकार परिषदेत विचारलं गेलं की जितेश शर्मा आणि संजू सॅमसन हे दोन विकेटकीपर आहे. यापैकी कोण खेळणार? संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये एन्ट्री मिळणार? यावर सूर्यकुमार यादवने उत्तर दिलं की, संजू सॅमसनवर आमचं लक्ष आहे. तुम्ही चिंता करू नका. आम्ही उद्या म्हणजेच सामन्याच्या दिवशी योग्य तो निर्णय घेऊ. सूर्यकुमार यादवने असं उत्तर देऊन पुन्हा एकदा संभ्रमात टाकलं आहे. त्यामुळे अजूनही काही स्पष्ट नाही. त्याच्या वक्तव्यातून एकच स्पष्ट होतं की, टीम इंडियासाठी जे योग्य असेल त्या नुसारच निर्णय घेतला जाईल.
टीम इंडियाच्या सरावादरम्यान संजू सॅमसनला दुखापत झाल्याची चर्चा रंगली आहे. तसेच सराव शिबीर पाहता संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं कठीण आहे. कारण तिथे जितेश शर्मा विकेटकीपिंग पूर्ण तयारी करताना दिसत आहे. त्यामुळे विकेटकीपर म्हणून त्यालाच संधी मिळू शकते. जर तसं झालं तर प्लेइंग 11 कशी असेल ते जाऊन घेऊयात
संजू सॅमसनशिवाय अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रिंकु सिंह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
