AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 स्पर्धेपूर्वी भारत पाकिस्तान कर्णधारांची शा‍ब्दिक चकमक, सलमानच्या स्ट्रॅटर्जीवर सूर्याचं उत्तर

आशिया कप 2025 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होत आहे. पण सर्वांचा नजरा या भारत पाकिस्तान सामन्याकडे लागून आहे. हा सामना 14 सप्टेंबरला असून दोन्ही संघांची शा‍ब्दिक चकमक सुरु झाली आहे. सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा यांचा आमनासामना झाला.

Asia Cup 2025 स्पर्धेपूर्वी भारत पाकिस्तान कर्णधारांची शा‍ब्दिक चकमक, सलमानच्या स्ट्रॅटर्जीवर सूर्याचं उत्तर
Asia Cup 2025 स्पर्धेपूर्वी भारत पाकिस्तान कर्णधारांची शा‍ब्दिक चकमक, सलमानच्या स्ट्रॅटर्जीवर सूर्याचं उत्तरImage Credit source: Getty Images/PTI
| Updated on: Sep 09, 2025 | 3:57 PM
Share

आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु झाली असली तरी सर्वांचं लक्ष हे 14 सप्टेंबरच्या सामन्याकडे आहे. कारण या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा आमनेसामने आले. या दोघांना भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी काही प्रश्न विचारले गेले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाचा पहिल्यांदाच पाकिस्तानशी सामना होत आहे. सूर्यकुमार यादवला विचारलं की, पाकिस्तान विरुद्ध तुमचा संघ अधिक आक्रमक असेल का? तेव्हा सूर्यकुमारने सांगितलं की, आक्रमकतेशिवाय सामना खेळला जाऊच शतक नाही. सूर्यकुमार यादवने सांगितलं की, ‘जेव्हा आम्ही मैदानात असतो तेव्हा आक्रमक बाणा असतोच. आक्रमक झाल्याशिवाय खेळ खेळला जाऊच शकत नाही. मी मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. तुम्हाला कोणत्याच खेळाडूला काही सांगण्याची गरज नाही, कारण प्रत्येक खेळाडू वेगळा आहे.’

दुसरीकडे, हाच प्रश्न फिरवून पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा विचारला गेला. तेव्हा त्याने उत्तर दिलं की, प्रत्येक खेळाडूला बिनशर्त सूट दिली आहे. सलमान आगाने सांगितलं की, ‘जर कोणता खेळाडू मैदानात आक्रमक होऊ इच्छित असेल तर त्याचं स्वागत आहे. वेगवान गोलंदाज खासकरून आक्रमक असतात. तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. त्यांच्यात कायम जोश असतो. मर्यादा पाळत सर्वकाही करत असाल तर माझ्याकडून कोणतीही अडचण नाही.’

दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या आणखी एका प्रश्नाने क्रीडारसिकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सूर्यकुमार यादवला विचारलं की आशिया कप जेतेपदासाठी टीम इंडिया दावेदार दिसत आहे. तेव्हा सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘कोण बोललं, मी तर असं काही ऐकलं नाही. बघा, तुमची तयारी चांगली आहे तर तु्म्ही मैदानात आत्मविश्वासाने उतरता. आम्ही खूप कालांतराने टी20 खेळत आहोत. पण आम्ही तीन चार दिवसापूर्वी आलो आहोत. येथे आम्ही एकत्र चांगला वेळ घालवला. मी या स्पर्धेसाठी तयार आहे.’ तर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने सांगितलं की, ‘टी20 क्रिकेटमध्ये कोणीही फेव्हरेट नसतो. ज्या दिवशी मॅच असते त्या दिवशी तुम्ही चांगले खेळला तर काही षटकातच सामन्याचं रुप पालटतं.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...