AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : भारत पाकिस्तान सामन्यासाठी पंचांची नियुक्ती, एक नाव वाचून भरली धडकी

आशिया कप स्पर्धेच्या साखळी फेरीच्या सामन्यांना 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी पंच आणि सामनाधिकारांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 10 पंच आणि 2 सामनाधिकाऱ्यांची या स्पर्धेवर बारीक नजर असणार आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर

Asia Cup 2025 : भारत पाकिस्तान सामन्यासाठी पंचांची नियुक्ती,  एक नाव वाचून भरली धडकी
Asia Cup 2025 : भारत पाकिस्तान सामन्यासाठी पंचांची नियुक्ती, एक नाव वाचून भरली धडकीImage Credit source: Getty Images
| Updated on: Sep 08, 2025 | 8:16 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे. ही स्पर्धा 28 सप्टेंबरपर्यंत चालणार असून या स्पर्धेसाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील पंचांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी एकूण 10 पंच निवडले असून दोन सामनाधिकारी आहेत.वीरेंद्र शर्मा आणि रोहन पंडित (भारत), अहमद पक्तीन आणि इजतुल्लाह सफी (अफगाणिस्तान), रुचिरा पल्लियागुरुगे आणि रवींद्र विमलासिरी (श्रीलंका), आसिफ याकूब आणि फैसल आफ्रिदी (पाकिस्तान), गाजी सोहेल आणि मसुदुर रहमान (बांगलादेश) अशी पंचांची नावं आहेत. वेस्ट इंडिजचे रिची रिचर्डसन आणि झिम्बाब्वेचे अँडी पायक्रॉफ्ट यांची मॅच रेफरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने या स्पर्धेसाठी सामनाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. ही नियुक्ती फक्त साखळी फेरीच्या सामन्यांसाठी आहे.

14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत पाकिस्तान हा सामना होणार आहे. हायव्होल्टेज सामना असलेल्या भारत पाकिस्तान सामन्यासाठीही पंचांची नावे जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील तीन पंचांकडे सोपवण्यात आली आहे. एसीसीने श्रीलंकेच्या रुचिरा पल्लियागुरुगे आणि बांगलादेशच्या मसुदुर रहमान यांना मैदानी पंच म्हणून घोषित केले आहे. अफगाणिस्तानचे अहमद पक्तीन टीव्ही पंच म्हणून काम पाहतील, तर अफगाणिस्तानचे इजतुल्लाह सफी चौथे पंच असतील, ते मैदानी पंचांना मदत करतील. अँडी पायक्रॉफ्ट या सामन्यात सामनाधिकारी असतील.

खरं तर श्रीलंकेचे रुचिरा पल्लियागुरूगे हे त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे जास्त चर्चेत असतात. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीने क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. वनडे वर्ल्डकप 2019 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज सामन्यात त्यांनी अनेक चुकीचे निर्णय दिले. त्यामुळे वेस्ट इंडिजला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. गेल्या वर्षी श्रीलंका आणि भारत यांच्यातील वनडे मालिकेदरम्यानही त्यांनी चुकीचे निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांची तुलना क्रीडाप्रेमी स्टीव्ह बकनरशी करत आहेत. त्यामुळे आतापासूनच क्रीडाप्रेमींना धाकधूक लागून आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...