AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: टीममधून वगळल्यास चर्चा नको, म्हणून Virat Kohli ने आधीच उचललं ‘हे’ पाऊल

IND vs SL: श्रीलंका सीरीजसाठी आज टीमची घोषणा होणार आहे. मुंबई-दिल्लीचे हे खेळाडू टीममध्ये दिसू शकतात.

IND vs SL: टीममधून वगळल्यास चर्चा नको, म्हणून Virat Kohli ने आधीच उचललं 'हे' पाऊल
Virat kohli-Rohit sharmaImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Dec 27, 2022 | 3:01 PM
Share

मुंबई: नवीन वर्षात 2023 मध्ये टीम इंडियाची पहिली सीरीज श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. श्रीलंकेची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही टीम्समध्ये तीन T20 आणि तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. या दोन्ही सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होऊ शकते. टी 20 सीरीजमध्ये टीम इंडियाचा नियमित कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार नसल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीने टी 20 सीरीजसाठी विश्रांती मागितली आहे. रोहित शर्मा अजूनही पूर्णपणे फिट नाहीय.

विराटने मागितला आराम

सिलेक्शन कमिटीची मंगळवारी बैठक होईल. यावेळी संपूर्ण फोकस रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असेल, क्रिकबजने हे वृत्त दिलय. रोहित शर्मा अजून पूर्णपणे फिट झालेला नाहीय. त्याच्या अंगठ्याची दुखापत लक्षात घेता, त्याला अजून काही दिवस विश्रांतीची गरज आहे. विराट कोहलीने सुद्धा टी 20 सीरीजसाठी आराम मागितला आहे.

हार्दिक पंड्या नेतृत्व करणार

न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाला T20 सीरीजमध्ये विजय मिळवून देणारा हार्दिक पंड्या श्रीलंकेविरुद्ध कर्णधार असेल. या सीरीजपासूनच टी 20 चा कायमस्वरुपी कॅप्टन म्हणून हार्दिकच्या नावाची घोषणा होऊ शकते. रोहित-विराट खेळणार नसल्याने सिलेक्टर्स युवा खेळाडूंना संधी देऊ शकतात. दिल्लीच्या यश ढुलला टीममध्ये संधी मिळू शकते. वनडे सीरीजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघे खेळताना दिसतील. 2023 मध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे खेळाडू वनडे सीरीजमध्ये खेळताना दिसतील.

नामुष्की टाळण्यासाठी विराटने विश्रांती मागितली का?

T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडकडून मानहानीकारक पराभव झाला. तेव्हापासून नेतृत्व आणि टीम बदलाची चर्चा सुरु आहे. वर्ल्ड कपनंतर बीसीसीआयने सर्वप्रथम निवड समिती बर्खास्त केली होती. टी 20 च्या दृष्टीने टीम इंडियात अमूलाग्र बदल होऊ शकतात. रोहित आणि विराटच वय लक्षात घेता, पुढच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्यांच्या खेळण्याबद्दल सांशकता आहे. टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्याची मागणी होत आहे. इशान किशन, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ असे टॅलेंटेड खेळाडू संधीच्या प्रतिक्षेत आहेत. टीम जाहीर करताना विराटला वगळल्यास त्यावरुन उलट-सुलट चर्चा होऊ शकते. त्यामुळे आधीच खबरदारी म्हणून विराटने विश्रांती घेतल्याची चर्चा आहे.

भारत-श्रीलंका सीरीजचा कार्यक्रम

तीन मॅचच्या टी 20 सीरीजचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. 3 जानेवारीला पहिला सामना खेळला जाईल. दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यात आणि तिसरा सामना 7 जानेवारीला सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.