AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA | Virat Kohli बद्दल मोठी बातमी, फॅमिली इमर्जन्सी, अचानक दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतला भारतात

IND vs SA Test Series | विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन अचानक भारतात का परतला? काय कारण आहे? कौटुंबिक इमर्जन्सी यामागे असल्याच बोलल जातय.

IND vs SA | Virat Kohli बद्दल मोठी बातमी, फॅमिली इमर्जन्सी, अचानक दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतला भारतात
Virat Kohli returened from South AfricaImage Credit source: PTI
| Updated on: Dec 22, 2023 | 2:19 PM
Share

IND vs SA Test Series | भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टेस्ट सीरीज येत्या 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. जोहान्सबर्गमध्ये पहिला कसोटी सामना होईल. मात्र, त्याआधी विराट कोहलीबद्दल एक मोठी बातमी आहे. विराट कोहली दक्षिण आफ्रिकेतून अचानक माघारी परतला आहे. काही कौटुंबिक इमर्जन्सीमुळे विराट भारतात परतल्याच बोलल जातय. अजूनपर्यंत कुठलीही ठोस माहिती मिळालेली नाही. अचानक विराट मुंबईत का निघून आला?. विराट कोहली 3 दिवसांपूर्वी मुंबईत आलाय. टीम इंडियाच्या इंट्रा-स्क्वाडमध्ये सुद्धा तो सहभागी होऊ शकला नाही.

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, विराट कोहलीच्या बाबतीत घाबरण्याची आवश्यकता नाहीय. रिपोर्ट्सनुसार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरीजमधून बाहेर गेलेला नाही. तो दोन्ही सामने खेळणार आहे. विराट कोहली शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेत पोहोचेल अशी माहिती आहे. फॅमिली इमर्जन्सीमुळे विराट कोहलीच्या तयारीवर परिणाम झालाय.

दक्षिण आफ्रिकेत विराटचा रेकॉर्ड कसा आहे?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरीजमध्ये विराट कोहलीची महत्त्वाची भूमिका असेल. दक्षिण आफ्रिकेत कॅप्टन रोहित शर्माचा रेकॉर्ड खूप खराब आहे. त्यामुळे विराटवर जास्त जबाबदारी असेल. विराटने दक्षिण आफ्रिकेत 51 पेक्षा जास्त सरासरीने 719 धावा केल्यात. यात दोन शतक आहेत. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत एकही टेस्ट सीरीज जिंकलेली नाही. विराटची बॅट चालली, गोलंदाजाची साथ मिळाली, तर यावेळी टीम इंडियाने टेस्ट सीरीज जिंकू शकते.

ऋतुराज गायकवाडच्या जागी कोणाला संधी?

विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये खेळू शकतो. पण टीम इंडियाचा एक ओपनर सीरीजमधून बाहेर गेलाय. ऋतुराज गायकवाडच्या बोटाला दुखापत झालीय. त्यामुळे तो टेस्ट सीरीजमधून बाहेर गेलाय. गायकवाडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तो तिसऱ्या वनडेमध्ये खेळू शकला नाही. ऋतुराजच्या जागी टेस्ट टीममध्ये कोणाला संधी मिळणार? ते अजून स्पष्ट झालेल नाहीय. रिपोर्ट्सनुसार सर्फराज खान आणि अभिमन्यु ईश्वरन दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच