Virat Kohli : ‘विराट’ शतकाची दोन वर्षांपासून प्रतीक्षाच! प्रश्न विचारताच म्हणाला…

कर्णधार विराट कोहलीच्या शतकाचा दुष्काळ न्यूझीलंड (New zealand) मालिकेतही संपू शकलेला नाही. विराट कोहलीने शेवटचे शतक 2019मध्ये बांगलादेशविरुद्ध पिंक बॉल कसोटीत केले होते.

Virat Kohli : विराट शतकाची दोन वर्षांपासून प्रतीक्षाच! प्रश्न विचारताच म्हणाला...
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 7:48 PM

मुंबई : विराट कोहली(Virat Kohli)च्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा 1-0 असा पराभव केला. यासह घरच्या मैदानावर टीम इंडिया(Team India)ची विजयी घोडदौड कायम आहे. हा सामना जिंकून विराटने तिन्ही फॉरमॅटमध्ये 50-50 सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. मात्र या विजयात काही अडचणी आहेत, ज्या अजूनही कायम आहेत. जसे की, कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म… त्याच्या शतकाचा दुष्काळ न्यूझीलंड (New zealand) मालिकेतही संपू शकलेला नाही. विराट कोहलीने शेवटचे शतक 2019मध्ये बांगलादेशविरुद्ध पिंक बॉल कसोटीत केले होते. या शतकाला दोन वर्षे झाली. त्यानंतर तिहेरी आकडा तो गाठू शकलेला नाही.

‘अशा बाबी नियंत्रित केल्या जाऊ शकतात’

याविषयी कोहलीला काही चिंता नसल्याचे दिसते. न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटीनंतर तो म्हणाला, की आमचा या प्रक्रियेवर विश्वास आहे, पण जर एकाच पद्धतीने आऊट होत असेल आणि पुन्हा पुन्हा तसेच होत असेल तर त्यावर काम करण्याची गरज आहे. यामध्ये 60 ते 70 चेंडू खेळल्यानंतर कळते. पुढे तो म्हणाला, की कधी कधी अशा गोष्टी आपोआप घडतात, तर कधी नाही. पण मेहनत आणि प्रक्रियेवर विश्वास कायम असायला हवा. यात कुठलाही हलगर्जीपणा नसावा. कारण ही गोष्ट स्वतःच्या अनुभवावरून समजते. जेव्हा चुकांची वारंवार पुनरावृत्ती होते, तेव्हा त्या ताबडतोब दुरुस्त केल्या पाहिजेत. स्वत:ला सुधारत राहावे लागेल आणि वारंवार होणाऱ्या चुका दूर करणे महत्त्वाचे आहे. यावर काम करावे लागेल, त्यानंतरच या गोष्टी टाळता येवू शकतात किंवा नियंत्रित केल्या जाऊ शकतात.

संघ निवडीवर भाष्य नाही

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीबाबत भाष्य केले नाही. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे(Ajinkya Rahane)च्या फॉर्ममुळे मधल्या फळीत अडचण आहे. अशा स्थितीत शुबमन गिल (Shubhman Gill) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. याबाबत तो म्हणाला, की येत्या काही दिवसांत कोणत्या ठिकाणी कोण खेळू शकते यासह इतर मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. याबाबत पत्रकार परिषदेत उत्तर देता येणार नाही. एकत्र बसून निर्णय घ्यावे लागतील.

Obc reservation : सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला, चंद्रकांत पाटलांचा आरोप

Omicron : मुंबईतील दोघांना ओमिक्रॉनची लागण, राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 10 वर, चिंता वाढली!

Nagpur | अनाथांचे नाथ ! वृद्ध गरजूंना ब्लांकेट्सचे वाटप, सांझज्योत सेवाभावी संस्थेचा पुढाकार