रजत पाटीदारचे निर्णय पाहून विराट कोहली संतापला! सामना सुरु असताना दिनेश कार्तिकशी आक्रमकपणे चर्चा Video

केएल राहुलच्या आक्रमक फलंदाजीमुळे आरसीबीला पराभवाला सामोरं जावं लागलं. केएल राहुलला थांबवण्यात आरसीबीच्या गोलंदाजांना अपयश आलं. त्यानंतर आरसीबीचा स्टार विराट कोहली हा दिनेश कार्तिकसोबत रागाने बोलत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रजत पाटीदारच्या निर्णयावर त्याने यावेळी नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.

रजत पाटीदारचे निर्णय पाहून विराट कोहली संतापला! सामना सुरु असताना दिनेश कार्तिकशी आक्रमकपणे चर्चा Video
Image Credit source: video grab
| Updated on: Apr 11, 2025 | 4:08 PM

आरसीबीच्या होमग्राउंडवर दिल्ली कॅपिटल्सने विजयी पतका फडकवली आहे. हा पराभव विराट कोहलीच्या खूपच जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे. या सामन्यादम्यान विराट कोहलीचा आक्रमक अंदाज कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विराट कोहली कर्णधार रजत पाटीदारवर नाराज असल्याची चर्चा आता रंगली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांच्यात आक्रमकपणे चर्चा होताना दिसत आहे. हे संभाषण कॅमेऱ्यात कैद झाले. यानंतर विराट कोहली कर्णधार रजत पाटीदारवर नाराज असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. व्हिडिओमध्ये कोहली काही निर्णयांवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. समालोचक आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग यांनीही याबद्दल समालोचन करताना मत मांडलं. त्यांनी सांगितलं की, जर कोहलीला काही अडचण असेल तर त्याने ती कर्णधार पाटीदारला सांगावी. कारण कोहली आता संघाचा कर्णधार नाही.

एका चाहत्याने सोशल मीडियावर लिहिले की, कर्णधाराच्या निर्णयांवर विराट कोहली संतापला आहे. याबाबत त्याने दिनेश कार्तिकशी गोलंदाजीतील बदलांवर चर्चा केली. इतर युजर्संनी लिहिलं की, कोहलीने कार्तिक यांच्यात काही निर्णयांबद्दल चर्चा झाल्याचं दिसत आहे. पण कोहली आणि कार्तिक यांच्यातील संभाषणामागील खरे कारण समोर आलेलं नाही. पण सोशल मीडियावर क्रीडाप्रेमी आपआपल्या पद्धतीने मतं मांडत आहेत. दुसरीकडे, सामन्यानंतर कर्णधार रजत पाटीदार याने दिल्लीविरुद्धच्या पराभवासाठी संघाच्या फलंदाजांना जबाबदार धरले.

रजत पाटीदार म्हणाला की, ‘मला वाटतं की आम्ही ज्या पद्धतीने विकेट पाहिली, ती खूपच वेगळी होती. आम्हाला वाटलं की ती एक चांगली फलंदाजी करणारी विकेट आहे, पण आम्ही चांगली फलंदाजी केली नाही.प्रत्येक फलंदाज चांगल्या मनःस्थितीत होता, योग्य हेतू दाखवत होता. पण 1 बाद 800 वरून 4 बाद 90 पर्यंत जाणे स्वीकारार्ह नव्हते. आमची फलंदाजी चांगली आहे, पण आम्हाला परिस्थितीचे मूल्यांकन करण्याची गरज आहे.’