Asia Cup साठी विराट कोहलीचा खास प्लान, मुंबईच्या मैदानातून सुरु होणार अभियान

| Updated on: Aug 09, 2022 | 11:44 AM

आशिया कपसाठी (Asia Cup) टीम इंडियाची (Team India) निवड झाली आहे. 15 सदस्यीय भारतीय संघात विराट कोहलीचा (Virat Kohli) समावेश करण्यात आला आहे.

Asia Cup साठी विराट कोहलीचा खास प्लान, मुंबईच्या मैदानातून सुरु होणार अभियान
virat-kohli
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: आशिया कपसाठी (Asia Cup) टीम इंडियाची (Team India) निवड झाली आहे. 15 सदस्यीय भारतीय संघात विराट कोहलीचा (Virat Kohli) समावेश करण्यात आला आहे. दीर्घ विश्रांती नंतर तो संघात पुनरागमन करणार आहे. संघात पुनरागमन केल्यानंतर टीमला आशिया चषक स्पर्धेत विजय मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी विराटने रणनितीची आखणी सुद्धा केली आहे. याची सुरुवात तो याच आठवड्यात मुंबईच्या मैदानात करणार आहे. फक्त आशिया कप स्पर्धेसाठीच नाही, तर आपला हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी विराट कोहलीने हा प्लान बनवला आहे.
भारताच्या इंग्लंड दौऱ्यापासूनच विराट कोहली टीम इंडियाच्या बाहेर आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी सुद्धा त्याचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. विराट या दरम्यान ब्रेक वर होता. आता त्याचा विश्रांतीचा कालावधी संपला आहे. एका नव्या रणनितीसह तो आशिया कप स्पर्धेत उतरणार आहे.

MCA च्या इंडोर अकादमीत विराट कोहली करणार प्रॅक्टिस

Insidesport.in सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहली या आठवड्यापासून आशिया कपसाठी प्रॅक्टिस सुरु करणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथी MCA इंडोर अकादमीत तो सराव सुरु करणार आहे. मुंबईत विराटच घर वरळी मध्ये आहे. इथून MCA ची इंडोर अकादमी 20 मिनिट अंतरावर आहे. म्हणून विराटने अभ्यासासाठी अकादमीची निवड केलीय. कोहलीने आपली फिजिकल ट्रेनिंग घरातच बनवलेल्या जीम मध्ये सुरु केली आहे.

हे सुद्धा वाचा

आशिया कपसाठी ‘विराट’ प्रॅक्टिस

आशिया कप स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरु होतेय. ही स्पर्धा 11 सप्टेंबरपर्यंत चालेल. पहिला सामना अफगाणिस्तान आणि बांगलादेश मध्ये होईल. दुसऱ्या सामन्यात 28 ऑगस्टला भारत आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळेल.
ब्रेक नंतर विराट कोहली पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. आशिया कप मध्ये त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. आशिया कपच्या या सीजन मध्ये त्याने तोच रेकॉर्ड कायम ठेवावा, अशी देशवासियांची इच्छा असेल. मुंबईतील सराव हे विराट कोहलीने स्वत:ला सिद्ध करण्याच्या दिशेने उचललेल एक पाऊल आहे.