Aryavir Sehwag : वीरेंद्र सेहवागचा लेक आता कॅप्टन! 18व्या वर्षी अंडर-19 टीमची धुरा, मोठी जबाबदारी

वीरेंद्र सेहवागचा मुलगा त्याच्या क्रिकेटमधील प्रचंड चांगल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे आता त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नेमकं काय घडलं आहे?

Aryavir Sehwag : वीरेंद्र सेहवागचा लेक आता कॅप्टन! 18व्या वर्षी अंडर-19 टीमची धुरा, मोठी जबाबदारी
Captain Aryavir Sehwag
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 6:52 PM

भारताचा माजी क्रिकेटर आणि विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा आर्यवीर हा सातत्याने चर्चेत आहे, त्याचीही खेळी क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेत आहे. पण आता त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आर्यवीरला आता दिल्ली क्रिकेट असोशिएशनने वीणू माकंड ट्रॉफीसाठी दिल्लीच्या अंडर 19 टीमच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. डीडीसीएच्या ज्यूनिअर पुरुष संघ निवडकर्त्यांची बैठक पार पडली. नुकत्याच पार पडलेल्या या बैठकीमध्ये 16 सदस्यांची टीम निवडण्यात आली आहे. ही स्पर्धा 8 ऑक्टोबर रोजी सुरु होणार आहे. विशाखापट्टनम मध्ये खेळवली जाणार आहे. दरम्यान, दिल्लीच्या युवा टीमचं नेतृत्व आता आर्यवीरच्या हाती असणार आहे तर उपकर्णधारपदी अर्नव बुग्गा याला संधी देण्यात आली आहे.

आर्यवीरलाच का दिली कर्णधारपदी संधी?

आर्यवीर सेहवागलाच का दिली आहे ही संधी, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना, तर त्यामागचं कारण म्हणजे त्याने अलिकडेच ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धझालेल्या वनडे मालिकेमध्ये उत्कृष्ट खेळी केली आहे. त्याचा वनडेमधील डेब्यूच होता तरीही त्यांनी चांगली कामगिरी केली. त्याने पहिल्या सामन्यामध्ये 28 धावांची खेळी केली होती. तर दुसरीकडे दुसऱ्या सामन्यात त्याने 47 धावा केल्या होत्या. त्यानंतर तो रन आऊट झाला होता. तर तिसऱ्या सामन्यामध्ये 34 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती.

Loading...

आर्यवीर हा सध्या 18 वर्षांचा आहे. त्याच्याकडे टी20मधील मोठा अनुभवही आहे. तो यावर्षी पार पडलेल्या दिल्ली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्येही सहभागी झालेला. वेस्ट दिल्ली लॉयंस संघाकडून तो खेळला होता. या सीरिजमध्ये त्याने दोन सामन्यांमध्ये 24 धावांची खेळी केली होती. त्यामुळे या सर्व स्पर्धांचा फायदा त्याला अंडर 19 कर्णधारपदाची धूरा सांभाळताना मिळणार आहे. त्यामुळे त्याला या मोठ्या जबाबदारीची जाणीवही आहे.

विनू मांकड ट्रॉफीसाठी दिल्लीचा 16 सदस्यीय संघ

आर्यवीर सेहवाग (कर्णधार), तन्मय चौधरी, अर्णव बुग्गा (उपकर्णधार), धन्या नाकरा, उदय चावला, गरव कुमार, अभिराज गगन सिंग (यष्टीरक्षक), तरुण सिंग (यष्टीरक्षक), आर्यन शर्मा, ओजसदीप सिंग, किरीट कौशिक, वरुण रावमान, वरुण राजमान, पार्टपुरुष, प्रवीण राजन, पू. शंतनू यादव.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us