काय तो अर्जुन तेंडुलकरच्या बॉलिंगचा वेग, इंग्लंडचा फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन, पहा VIDEO

| Updated on: Jul 20, 2022 | 5:44 PM

भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांना क्रिकेटचा देव म्हटलं जातं. कारण त्यांची कामगिरीच तशी आहे. सचिन जिथे-जिथे क्रिकेट खेळायला गेले, तिथे-तिथे त्यांनी आपल्या फलंदाजीची जादू दाखवली.

काय तो अर्जुन तेंडुलकरच्या बॉलिंगचा वेग, इंग्लंडचा फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन, पहा VIDEO
Arjun Tendulkar
Follow us on

मुंबई: भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांना क्रिकेटचा देव म्हटलं जातं. कारण त्यांची कामगिरीच तशी आहे. सचिन जिथे-जिथे क्रिकेट खेळायला गेले, तिथे-तिथे त्यांनी आपल्या फलंदाजीची जादू दाखवली. आजही जगभरात सचिन तेंडुलकर यांचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरकडून (Arjun Tendulkar) अपेक्षा होत्या. अर्जुनला अजून वडिलांएवढं यश मिळवता आलेलं नाही. पण अधंन-मधंन तो आपल्या क्षमतेची चुणूक दाखवत असतो. आयपीएल मध्ये मागचे दोन सीजन अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) भाग होता. पण तरीही त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. अर्जुन तेंडुलकरने मात्र आपले प्रयत्न कमी केलेले नाहीत. सध्या तो इंग्लंड मध्ये आपल्यातील कौशल्य दाखवून देतोय. अलीकडेच याचं एक उदहारण पहायला मिळालं. अर्जुनच्या एका वेगवान चेंडूने समोरच्या फलंदाजाचा खेळ संपवला.

गोलंदाजीचा जलवा दाखवला

अर्जुन तेंडुलकर अनेकदा ऑफ सीजनला इंग्लंडमध्ये प्रॅक्टिस करतो. सध्या तो इंग्लंडमध्येच आहे. तिथे प्रतिष्ठीत काऊंटी क्रिकेट क्लब मिडिलसेक्स मध्ये तो सराव करतोय. या क्लब कडून मंगळवारी 19 जुलैला एका मैत्री सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अर्जुनने आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवला. सामन्यात त्याने फक्त किफायती गोलंदाजीच केली नाही, तर टॉप ऑर्डरच्या एका महत्त्वाच्या फलंदाजाला बाद केलं.

अर्जुनची जबरदस्त गोलंदाजी

मिडिलसेक्सच्या सेकंड इलेव्हन आणि क्लब क्रिकेट कॉन्फरन्स इलेव्हन मध्ये 50-50 षटकांचा सामना खेळवण्यात आला. यात अर्जुन मिडिलसेक्सकडून खेळत होता. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला या सामन्यात 4 षटकं गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. यात त्याने 16 धावा देऊन 1 विकेट काढली. तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजी करणाऱ्या डीए आयरनसाइडची विकेट त्याने काढली.

चेंडू विकेटकीपरच्या ग्लोव्हज मध्ये विसावला

अर्जुनने ऑफ स्टम्पच्या लाइन मध्ये एक गुड लेंथ चेंडू टाकला. या चेंडूला वेगही होता आणि बाऊन्सही. फलंदाज या चेंडूवर चकला. बॅट त्याची उशिराने आली. तो पर्यंत चेंडू बॅटची कड घेऊन विकेटकीपरच्या ग्लोव्हज मध्ये विसावला होता.

अर्जुनचा संघ सहज जिंकला

अर्जुनसह संघातील अन्य गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केलं. क्लब क्रिकेट इलेव्हनचा संघ फक्त 257 धावा करु शकला. अर्जुनला या मॅच मध्ये फलंदाजीची संधी मिळाली नाही. कारण वरच्याफळीतील फलंदाजांनीच संघाला विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचवलं. मिडिलसेक्सकडून जेएलबी डेविएस्टने 94 आणि ओड्रिस्कॉलने 79 धावा केल्या. त्यांनी हा सामना 7 विकेटने जिंकला.