Yuzvendra Chahal IPL 2022 Video: युजवेंद्र चहलचा जलवा, 5 विकेट्स घेत KKRचं कंबरडं मोडलं, पहा सर्व विकेट्स एका क्लिकवर

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये सोमवारी (18 एप्रिल) क्रिकेट रसिकांना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (RR vs KKR) यांच्यात एक रोमाचंक सामना पहायला मिळाला. या सामन्यात अनेक चढ-उतार पहायला मिळाले.

Yuzvendra Chahal IPL 2022 Video: युजवेंद्र चहलचा जलवा, 5 विकेट्स घेत KKRचं कंबरडं मोडलं, पहा सर्व विकेट्स एका क्लिकवर
आयपीएलच्या पर्पल कॅपमध्ये युझवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावरImage Credit source: Rajasthan Royals Twitter
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 1:20 PM

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये सोमवारी (18 एप्रिल) क्रिकेट रसिकांना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (RR vs KKR) यांच्यात एक रोमाचंक सामना पहायला मिळाला. या सामन्यात अनेक चढ-उतार पहायला मिळाले. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 217 अशी विशाल धावसंख्या उभारली. त्यामुळे राजस्थान हा सामना सहज जिंकेल, असं वाटत होतं. पण कोलकात्याचा सलामीवीर अॅरॉन फिंच आणि कर्णधार श्रेयस अय्यरने सुरुवातीला सर्व अंदाज चुकीचे ठरवला. मोठया धावसंख्येचा केकेआरने आक्रमक सुरुवात करत पाठलाग सुरु केला. सुनील नरेनची पहिल्याच षटकात विकेट गेली. पण त्यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आणि फिंचने डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. फिंचने 28 चेंडूत 58 धावा फटकावल्या. यात 9 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना फिंच करुण नायरकडे सोपा झेल देत बाद झाला.

फिंच बाद झाल्यावर श्रेयस अय्यरने सामन्याची सूत्रं आपल्या हाती घेतली. त्याने तुफानी फटकेबाजी सुरु ठेवली. राजस्थानच्या गोलंदाजांना अजिबात दाद दिली नाही. श्रेयस मैदानात असताना हा सामना कोलकात्याचा संघ सहज जिंकेल असं वाटत होतं. परंतु युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर तो मोक्याच्या क्षणी पायचित झाला. श्रेयसने 51 चेंडूत 85 धावा फटकावल्या. या खेळीत सात चौकार आणि चार षटकार लगावले. आंद्रे रसेल या केकेआरच्या धोकादायक फलंदाजाला अश्विनने पहिल्याच चेंडूवर माघारी धाडलं.

रसेल बाद झाला तरी कोलकात्याच्या फलंदाजीत अजून बराच जीव बाकी होता. व्यंकटेश अय्यर, पॅट कमिन्स, शेल्डन जॅक्सन असे तगडे फलंदाज अजून बाकी होती. परंतु फिरकीपटून युजवेंद्र चहलच्या फिरकीसमोर कोणाचं काहीच चाललं नाही. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सामना अंतिम टप्यात आला असतानाच कप्तान संजूने चहलच्या हाती चेंडू दिला. त्याने 17 व्या षटकात कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्सला तंबूत परत पाठवलं. आयपीएलच्या इतिहासातली ही 21 वी हॅट्ट्रिक आहे. त्याहून मोठी गोष्ट म्हणजे चहलने बाद केलेले तीनही मोहरे हे केकेआरचे तगडे फलंदाज आहेत. पॅट कमिन्सला बाद करत त्याने हॅट्ट्रिक पूर्ण केली.

चहलच्या पाच विकेट्सचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राजस्थानचा ‘हल्लाबोल’

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक गमावली. मात्र केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने त्यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने पाच गड्यांच्या बदल्यात 217 धावांचा डोंगर उभा केला. जॉस बटलरने 61 चेंडूत 103 धावा ठोकल्या. त्यात 9 चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. त्यानंतर संजू सॅमसनने 38 आणि हेटमायरनं नाबाद 26 धावांचं योगदान दिलं. या तिघांच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने 200 धावांचा टप्पा पार केला. कोलकात्याकडून सुनील नारायणने दोन बळी घेतले.

218 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकात्याची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी पहिल्याच चेंडूवर सुनील नारायणची विकेट गमावली. पण त्यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आणि फिंचने डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली.

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची धमछाक झाली. त्यात एकट्या चहलनं पाच विकेट घेतल्या. परिणामी 19.4 षटकात 210 धावांवर कोलकात्याचा संपूर्ण संघ बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 85 धावा फटकावल्या. तर एरॉन फिंचनं 58 धावांचं योगदान दिलं. आयपीएलमध्ये पदापर्ण करणाऱ्या ओबेद मॅक्कॉयनं दोन विकेट घेतल्या. दरम्यान पाच बळी घेणाऱ्या चहलने चार षटकात 40 धावा दिल्या.

इतर बातम्या

IPL 2022 Orange Cap : जॉस बटलर 272 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर,पर्पल कॅप युझवेंद्र चहलकडे कायम

RR vs KKR IPL Match Result: अरेरे, KKR चा निसटता पराभव, चहलची गेम चेंजिंग ओव्हर

RR vs KKR IPL 2022: दोघांनी मिळून घेतली एक कॅच, पहा बाउंड्रीवरील अफलातून झेल VIDEO, तुम्ही सुद्धा म्हणाल जबरदस्त

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.