वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत पाकिस्तानचा अपमान, शाहीद आफ्रिदीला बाहेर फेकलं

World Championship Of Legends: इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंज्स स्पर्धेची सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदीला दणका बसला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत पाकिस्तानचा अपमान, शाहीद आफ्रिदीला बाहेर फेकलं
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत पाकिस्तानचा अपमान, शाहीद आफ्रिदीला बाहेर फेकलं
Image Credit source: अ‍ॅलेक्स डेव्हिडसन-ICC/ICC द्वारे गेटी इमेजेस
| Updated on: Jul 18, 2025 | 10:19 PM

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत पाकिस्तान संघाचं नेतृत्व शाहीद आफ्रिदीच्या हाती आहे. पण ही स्पर्धा सुरु होण्याआधीच पाकिस्तानच्या कर्णधारावर नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. नेमकं असं का झालं असावं असा प्रश्नही ते सोशल मीडियावर विचारत आहेत. त्याला कारणंही तसंच आहे. या स्पर्धेच्या प्रोमो पोस्टरमधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या स्पर्धेचं पोस्टर 16 जुलैला लाँच करण्यात आलं होतं. मात्र सर्व या फोटोत सर्व कर्णधारांचे फोटो आहेत. पण या पोस्टरमधून शाहीद आफ्रिदीचा फोटो मात्र वगळण्यात आला आहे. शाहीद आफ्रिदीला का वगळलं याचं कारणं शोधण्याच्या भानगडीत पडू नका. त्याचं कारण असं की ही स्पर्धेचं प्रायोजक भारतीय कंपनीकडे आहे. मागच्या काही काळापासून भारत पाकिस्तान संबंध ताणले गेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शाहीद आफ्रिदीला या पोस्टरमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

दुसरीकडे, नुसतं पोस्टरच्या बाहेर काढून काय फायदा? भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ भिडणार आहेत. निवृत्त झालेल्या खेळाडूंची लीग असली तरी आजही त्या खेळाडूंची क्रीडाप्रेमींमध्ये कायम आहे. मागच्या पर्वात भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला नमवून जेतेपदावर नाव कोरलं होतं. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 156 धावा केल्या आणि विजयासाठी 157 धावा दिल्या होत्या. भारताने 19.1 षटकात 5 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं.

 वर्ल्ड चॅम्पियनशिप लिजेंड्सचे सहा संघ

भारत चॅम्पियन्स : युवराज सिंग, शिखर धवन, हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, पियुष चावला, स्टुअर्ट बिन्नी, वरुण आरोन, विनय कुमार, अभिमन्यू मिथुन, सिद्धार्थ कौल, गुरकीरत मान.

पाकिस्तान चॅम्पियन्स: मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, सर्फराज अहमद, शरजील खान, वहाब रियाझ, आसिफ अली, शाहिद आफ्रिदी, कामरान अकमल, आमिर यामीन, सोहेल खान, सोहेल तन्वीर

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स: ब्रेट ली, शॉन मार्श, ख्रिस लिन, मोइसेस हेन्रिक्स, बेन कटिंग, डार्सी शॉर्ट, नॅथन कुल्टर-नाईल, पीटर सिडल, कॅलम फर्ग्युसन, डॅन ख्रिश्चन, बेन डंक, स्टीव्ह ओ’कीफ, रॉब क्विनी, जॉन हेस्टिंग्ज.

इंग्लंड चॅम्पियन्स: इऑन मॉर्गन, मोईन अली, अ‍ॅलिस्टर कुक, इयान बेल, रवी बोपारा, समित पटेल, लियाम प्लंकेट, ख्रिस ट्रेमलेट, अजमल शहजाद, दिमित्री मस्कारेन्हास, फिल मस्टर्ड, टिम अ‍ॅम्ब्रोस, रायन साइडबॉटम, स्टुअर्ट मीकर, उस्मान अफझल.

दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स: एबी डिव्हिलियर्स, हाशिम आमला, ख्रिस मॉरिस, अल्बी मॉर्केल, जेपी ड्युमिनी, इम्रान ताहिर, वेन पारनेल, जेजे स्मट्स, हार्डस विलजोएन, रिचर्ड लेव्ही, डेन विलास, एसजे एरवी, ड्वेन ऑलिव्हियर, मॉर्न व्हॅन विक, आरोन फिंगोस.

वेस्ट इंडिज चॅम्पियन्स: ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ, शेल्डन कॉट्रेल, शिवनारायण चंद्रपॉल, चाडविक वॉल्टन, शॅनन गॅब्रिएल, अ‍ॅशले नर्स, फिडेल एडवर्ड्स, विल्यम पर्किन्स, सुलेमान बेन, डेव्ह मोहम्मद, निकिता मिलर.