मी तुला लग्नाची मागणी घालेन…! WCL मालकाने अँकरला Live सामन्यात दिला आश्चर्याचा धक्का, Video

वर्ल्ड चॅम्पियनशिप लीग 2025 स्पर्धेचं दुसरं पर्व इंग्लंडमध्ये पार पडलं. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने पाकिस्तानला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं. यात एबी डिव्हिलियर्सची शतकी खेळी चर्चेचा विषय ठरली. आता या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मी तुला लग्नाची मागणी घालेन...! WCL मालकाने अँकरला Live सामन्यात दिला आश्चर्याचा धक्का, Video
मी तुला लग्नाची मागणी घालेन...! WCL च्या मालकाने अँकरला Live सामन्यात दिला आश्चर्याचा धक्का
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 03, 2025 | 7:40 PM

वर्ल्ड चॅम्पियनशिप लीग 2025 स्पर्धेचं दुसरं पर्व नुकतंच पार पडलं. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले होते. दक्षिण अफ्रिकेने एबी डिव्हिलियर्सच्या नेतृत्वात पाकिस्तानला धोबीपछाड दिला. सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यात एबी डिव्हिलियर्सने पाकिस्तानच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 195 धावा केल्या. तसेच विजयासाठी 196 धावा दिल्या. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 16.5 षटकात एक गडी गमवून पूर्ण केलं. यात एबी डिव्हिलियर्सने नाबाद 120 धावांची आक्रमक खेळी केली. यात त्याने 60 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 120 धावा केल्या. असं असताना या सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दुसरा तिसरा कोणाचा नसून वर्ल्ड चॅम्पियनशिप लीग मालकाचा आहे. त्याने एका अँकरला लाईव्ह शो दरम्यान लग्नाची मागणी घातली.

2 ऑगस्टला वर्ल्ड चॅम्पियनशिप लीग 2025 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना सुरु होण्यापूर्वी एका कार्यक्रमात अँकर करिश्मा कोटक मैदानात होती. तिने डब्ल्यूसीएल मालक आणि सीईओ हर्षित तोमर याच्याशी चर्चा केली. करिश्माने शेवटी तोमरला विचारलं की,स सामना संपल्यानंतर कसं सेलिब्रेट करणार? या प्रश्नावर तोमरने उत्तर देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तोमरने सांगितलं की, ‘एकदा हे सर्व काही संपू दे मी तुला लग्नाची मागणी घालेन.’ असं बोलल्यानंतर तोमर हसला आणि निघून गेला. करिश्मा कोटकला काय झालं हेच कळलं नाही. ती फक्त ओह माय गॉड म्हणाली आणि हसू लागली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हर्षित तोमर आणि करिश्मा कोटक यांच्यात काही नातं आहे का मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. पण स्पर्धा संपल्यानंतर तोमरने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात करिश्मा सोबत असून त्यात लाल रंगाचा इमोजी कॅप्शनमध्ये वापरला आहे. या फोटोखाली नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. पण त्यांच्या नात्याबाबत अजून कोणताही खुलासा नाही.