AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिराजने झेल पकडला आणि प्रसिद्धच्या चेहऱ्यावरचं हसू गेलं, कारण… Video

भारत आणि इंग्लंड पाचवा कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. भारताला विजयासाठी विकेट आणि इंग्लंडला धावांची गरज आहे. अशा स्थितीत विकेट खूपच महत्वाच्या आहेत. पण सिराजची एक चूक टीम इंडियाला भोवली.

सिराजने झेल पकडला आणि प्रसिद्धच्या चेहऱ्यावरचं हसू गेलं, कारण... Video
सिराजने झेल पकडला आणि प्रसिद्धच्या चेहऱ्यावरचं हसू गेलं, कारण... VideoImage Credit source: video grab
| Updated on: Aug 03, 2025 | 5:55 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना रंगतदार वळणावर आला आहे. प्रत्येक विकेटनंतर आणि धाव घेतल्यानंतर सामन्याचं पारडं इकडेतिकडे झुकत आहे. अशा स्थितीत दोन्ही बाजूच्या खेळाडूंचा कस लागला आहे. काहीही झालं तर या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. कारण दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. त्यात इंग्लंडने लंच ब्रेकपर्यंत 3 गडी गमवून 164 धावा केल्या आहेत. अजूनही इंग्लंडला विजयासाठी 210 धावांची गरज आहे. हॅरी ब्रूक आणि जो रूट मैदानात आहेत. त्यामुळे हा सामना इंग्लंडच्या पारड्यात झुकलेला आहे. या दोन विकेट घेण्याचं मोठं आव्हान टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर आहे. भारताला लंच ब्रेकपूर्वी ही जोडी फोडण्याची संधी मिळाली होती. मात्र ही संधी मोहम्मद सिराजच्या एका चुकीमुळे गमावली. कदाचित या चुकीचा फटका सामन्याच्या निकालावर पडू शकतो.

कर्णधार शुबमन गिलने संघाचं 35वं षटक प्रसिद्ध कृष्णाकडे सोपवलं होतं. तेव्हा जो रूट 20 आणि हेन्री ब्रूक हा 19 धावांवर खेळत होते. ही जोडी फोडली की विजयाचा मार्ग सुकर होईल याचा अंदाज शुबमन गिलला होता. त्यामुळेच त्याने चेंडू प्रसिद्ध कृष्णाकडे सोपवला. पहिल्याच चेंडूवर ब्रूकने जोरदार प्रहार केला. चेंडू वर चढला आणि थेट सिराजच्या हातात गेला. पण सिराजने झेल घेतल्यानंतर एक चूक केली आणि थेट सीमारेषेबाहेर गेला. खरं तर चेंडू सीमारेषेच्या आताच होता. इथे सीमारेषेबाहेरचा झेल खेळाडू पकडतात. पण सिराजने ती चूक केली. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. एक तर झेल गेला आणि फुकटच्या सहा धावाही मिळाल्या.

लंच ब्रेकपर्यंत हेन्री ब्रूकने 30 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार मारत 38 धावा केल्या. त्यामुळे ब्रूकची प्रत्येक धाव ही इंग्लंडसाठी बोनस असणार आहे. तसेच भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे आता ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान असणार आहे. जर ही जोडी फोडण्यात अपयश आलं तर भारताचा विजयाचं स्वप्न लांबणार आहे. भारताने हा सामना जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल. अन्यथा ही मालिका 3-1 ने इंग्लंड जिंकेल. त्यामुळे या सामन्याची रंगत आणखी वाढणार आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.