कधी गायकाच्या पित्यावर छेड काढल्याचा आरोप, तर कधी पतीवर पॅनने मारहाणीचा आरोप, विनोद कांबळीची पत्नी आता काय करते?
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि डावखुरा शैलीदार फलंदाज विनोद कांबळी याच्या सध्याच्या दुरावस्थेचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर आता त्याची मॉडेल पत्नी सध्या काय करते ?याविषयी देखील चर्चा सुरु आहेत.

एकेकाळचा सुपरस्टार क्रिकेटटर विनोद कांबळी याची सध्या कडकी चालू आहे. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर सोबत एकत्र करीयरची सुरुवात करणाऱ्या विनोद कांबळी याचा जबरदस्त फॉर्म संपल्यानंतर त्याचा डाऊनफॉल सुरु झाल. तो क्रिकेट टीममध्ये आत बाहेर होत राहीला. त्याने करीयर ऐवजी ग्लॅमर आणि फॅशनकडे लक्ष दिल्याने त्याची ही अवस्था झाल्याचा आरोप क्रिकेटचे त्याचे फॅन देखील करतात. चुकीच्या सवयींपासून तो वेळेत बाहेर पडला नाही त्याचा फटका त्याच्या करीयरसह त्याच्या कुटुंबावर देखील बसला आहे.
वादाने भरलेले करीयर
मद्यपानाच्या सवयीने त्याने कोण आपला आणि कोण चुकीचा ही ओळखच विनोद विसरल्याचे म्हटले जात आहे. अनेक आजाराने त्याला घेरलेले आहे. ५२ वर्षांच्या वयात तो आता ७२ वयाचा दिसत आहे.ज्या लोकांनी विनोद कांबळी त्याच्या चलतीच्या काळात पाहीले आहे त्यांना यावर विश्वासच बसत नाही. एकेकाळी सचिन तेंडुलकर पेक्षाही जादा प्रतिभावान असलेल्या विनोद कांबळी याची अशी अवस्था का झाली यावर आता खूप चर्चा झाल्या आहेत.
1998 मध्ये हॉटेल रिसेप्शनिस्टने केला विवाह
विनोद कांबळी याच्या क्रिकेट करीयर मध्ये नव्हेत तर खाजगी आयुष्यातही चढ – उतार पाहायला मिळाले आहेत. विनोद कांबळीची दोन लग्न झालेली आहे. पहिला विवाह साल १९९८ मध्ये नोएला लुईस हीच्याशी झाला होता.नोएला पुणे येथील हॉटेल ब्ल्यू डायमंडमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब करीत होती. ही प्रेमकहानी जास्त काळ चालली नाहीत. त्याचा नोएला हीच्याशी घटस्फोट झाला. नोएला त्याच्या व्यसनाला कंटाळली होती,त्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जाते.
मॉडेल एंड्रिया हीच्याशी दुसरी लग्न
त्यानंतर विनोद कांबळी याच्या जीवनात एंड्रिया हेविट ही तरुणी आली. एंड्रिया ही माजी मॉडेल आणि फॅशनेबल तरुणी होती. बातम्यानुसार कांबळी आणि एंड्रियाची भेट साल २००० च्या आसपास झाली होती. त्यानंतर दोघांचे प्रेम जुळले. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर विनोद याने २००६ मध्ये तिच्याशी एका खाजगी समारंभात विवाह केला. कांबळी याला एक मुलगा जीसस क्रिस्टियानो आणि एक मुलगी आहे.
बॉलीवुड गायकाच्या वडीलांवर छेड काढल्याचा आरोप
जुलै २०१८ मध्ये विनोद कांबळी याची पत्नी एंड्रिया हेविट चर्चेत आली. तेव्हा तिने बॉलीवूड पार्श्वगायक अंकित तिवारी याचे वडील राजकुमार तिवारी याला खुलेआम पंच मारला होता. राजकुमार तिवारी याने अश्लील वागल्याचा आरोप तेव्हा एंड्रिया हीने केला होता. प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहचले होते. कांबळी याने एंड्रिया हीच्याशी विवाह करताना ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. परंतू या नात्यात देखील दरी निर्माण झाली.एंड्रिया हीने कांबळी याच्यावर घरगुती अत्याचाराचा आरोप केला होता.
पत्नीचा कांबळीवर मारहाणीचा आरोप
विनोद कांबळी याने आपल्याला फ्राय पॅनने मारल्याचा आरोप एंड्रिया हीने पोलिसांकडे केला होता. वादविवाद झाल्यानंतर विनोद आपल्यावर पॅन हल्ला केल्याचे तिने म्हटले होते. त्यानंतर एंड्रिया हीने आपल्या दोन मुलांसह कांबळीचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या नात्याची वर्तमान स्थिती अजूनही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे कांबळी याची मुले त्याच्या सोबत राहतात की नाही हे कळलेले नाही.त्याचे चाहत्यांना कांबळी लवकर बरा होऊन त्याने उर्वरित आयुष्य चांगले जगावे असे वाटत आहे.
