
IND vs NZ ODI : भारत आणि न्यूझीलंड वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला दुखापतीमुळे संघाचा बाहेर केलं आहे. त्याच्या जागी आयुष बदोनीला संधी दिली गेली आहे. वॉशिंग्टन सुंदर पहिल्या वनडे सामन्यात खेळला होता. त्याने 5 षटकं टाकली आणि 27 धावा दिल्या. एकही विकेट घेता आली नाही. तर फलंदाजीत 7 चेंडूत नाबाद 7 धावांची खेळी केली. आता त्याची जागा आयुष बदोनी घेणार आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. असं असताना रियान परागचा विचार न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रियान परागचे चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रश्नांचा भडिमार केला आहे. त्याला वनडे संघात स्थान न देण्याचं कारण काय? माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनेही हा मुद्दा उचलून धरला आहे. रियानला संधी न मिळण्याचं कारण काय? ते समजून घेऊयात.
वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्यानंतर रियान परागची संघात निवड होऊ शकली असती. पण त्याच्या फिटनेसमुळे संघात निवड झाली नाही. रिपोर्टनुसार, रियान पराग फिट नाही आणि त्यामुळेच विजय हजारे ट्रॉफीत खेळत नाही. जर तंदुरूस्त असता तर आयुष बदोनीची जागा घेतली असती. रियान परागने भारतासाठी एक वनडे आणि 9 टी20 सामने खेळला आहे. फलंदाज म्हणून रियान पराग काय छाप सोडू शकला नाही. पण गोलंदाजीत त्याने कमाल केली आहे. एका वनडे सामन्यात त्याने तीन आणि टी20 सामन्यात चार बळी घेतले आहेत. इतकंच काय तर 6.7च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या आहेत.
If Riyan Parag was fit he would have been ideal replacement for Washington sundar.
Congratulations to Ayush Badoni for Team India call up. He had few decent hits for India A
For India A, he scored 66(66) vs South Africa A in November and 21(20) & 50(27) vs Australia A in…
— Irfan Pathan (@IrfanPathan) January 12, 2026
आयुष बदोनी वॉशिंग्टन सुंदरच्या जागी फिट बसतो. कारण मधल्या फळीत फलंदाजी करतो आणि ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. त्याने 21 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 57.96 च्या सरासरीने 1681 धावा केल्या. चार शतकं आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. बदोनीने लिस्ट ए मध्ये 22 डावात 36पेक्षा जास्त सरासरीने 693 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. टी20मध्ये 79 सामन्यांमध्ये 1788 धावा केल्यात. यात 10 अर्धशतकांचा समावेश आहे. इतकंच काय तर तिसऱ्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकापर्यंत कुठेही फलंदाजी करू शकतो. गोलंदाजीत त्याने एकूण 57 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे आता पदार्पणाच्या सामन्यात आयुष बदोनी काय कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.