AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat vs Gambhir IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीरमधील मैत्री दुश्मनीमध्ये कधी बदलली? नेमकं काय झालेलं?

Virat vs Gambhir IPL 2023 : दोघे दिल्लीचेच पण मैत्री शत्रुत्वामध्ये बदलायला एक प्रसंग कारणीभूत आहे. दोघे एकत्र टीम इंडियातून खेळले आहेत. मग दोघांमध्ये बिनसलं कशावरुन? मैत्री दुश्मनीमध्ये कशी बदलली?

Virat vs Gambhir IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीरमधील मैत्री दुश्मनीमध्ये कधी बदलली? नेमकं काय झालेलं?
ipl 2023 virat kohli-Gautam GambhirImage Credit source: twitter
| Updated on: May 02, 2023 | 1:48 PM
Share

लखनौ : टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये काल मोठा वाद झाला. दोघांमधील जाहीर भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये काल लखनौमध्ये सामना झाला. ही मॅच संपल्यानंतर सर्व वाद उफाळून आला. या भांडणाची स्क्रिप्ट आधीच सामना सुरु असताना लिहिली गेली होती. त्यावेळी विराट कोहली आणि लखनौच्या खेळाडूंमध्ये मैदानावर वादावादीचे प्रसंग घडले होते.

यंदाच्या सीजनमध्ये लखनौ आणि बँगलोरच्या टीममध्ये झालेला पहिला सामना लखनौने जिंकला होता. त्यावेळी लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीरने मैदानात येऊन चूप रहाण्याचा इशारा करुन बँगलोरच्या फॅन्सना डिवचलं होतं.

दोघे पण दिल्लीचेच आहेत

त्यामुळे सीजनमधील दुसरा सामना खेळताना, दोन्ही टीम्समधील वातारवण चार्ज असणं स्वाभाविक होतं. त्याचे पडसाद सुद्धा कालच्या सामन्यात पहायला मिळाले. खरंतर वाद घालणारे विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघे दिल्लीचे आहेत. एका राज्याच्या टीममधून खेळलेल्या प्लेयर्समध्ये चांगली मैत्रीची भावना असते. महत्वाचं म्हणजे दोघे एकत्र टीम इंडियातून खेळले आहेत. मग दोघांमध्ये बिनसलं कशावरुन? मैत्री दुश्मनीमध्ये कशी बदलली? असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे.

त्यावेळी दोघे चांगले मित्र होते

कोलकात्यात 2009 साली श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीने (107) शतकी खेळी साकारली. ते विराटच वनडेमधील पहिलं शतक होतं. त्या मॅचमध्ये गौतम गंभीरने नाबाद 150 धावा केल्या होत्या. गौतम गंभीरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला. त्यावेळी विराट आणि गौतम गंभीर परस्परांचे चांगले मित्र होते. दोघांच्या मनात परस्परांबद्दल सन्मान होता.

तेव्हा, संबंध बिघडले ते कायमचेच

पण IPL 2013 मध्ये एका मॅचनंतर हे सर्वकाही संपलं. त्यावेळी कालच्या सारख्याच हजारो लोकांसमोर हे खेळा़डू परस्परांशी भिडले होते. विराट कोहली त्या मॅचमध्ये आऊट झाल्यानंतर शिवी देत चालला होता. गंभीरने त्यावेळी विराटला, शिवी का दिली? या बद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी सर्व काही कॅमेऱ्यात कैद झालं. या घटनेनंतर दोन्ही खेळाडूंमधील संबंध बिघडले ते कायमचेच. आता वेळोवेळी मनातील ती शत्रुत्वाची भावना दिसून येते. गौतम गंभीर अनेकदा कार्यक्रमामध्ये बोलताना विराट कोहलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. विराटवर टीका करताना दिसतो. काल झालेल्या वादावादीला या सगळ्यीच सुद्धा किनार आहे.

Follow Us
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?