
केएल राहुल भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या टी20 संघात त्याला संधी मिळत नाही. पण वनड़े आणि कसोटी संघात त्याचं स्थान जवळपास पक्कं आहे. कसोटी क्रिकेमध्ये केएल राहुल ओपनिंगला उतरतो. तसेच वनडे क्रिकेटमध्ये फिनिशरची भूमिका बजावतो. इतकंच काय तर विकेटकीपिंगही करतो. पण टी20 संघात त्याच्यासाठी जागा नाही हे निश्चित आहे. असं असताना केएल राहुलने एका मुलाखतीत क्रिकेट निवृत्तीबाबत खुलासा केला आहे. त्याच्या मनात निवृत्तीचा विचार आला होता. त्यानंतर त्याने आपला विचार बदलला. पण सध्या काय विचार करत आहे? याबाबत त्याने आपलं म्हणणं मांडलं. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनसोबत झालेल्या मुलाखतीत त्याने हा खुलासा केला.
केएल राहुल 33 वर्षांचा आहे. त्याने 67 कसोटी, 94 वनडे आणि 72 टी20 सामने खेळले आहेत. केएल राहुलने या मुलाखतीत त्याने स्पष्ट सांगितलं की, निवृत्तीचा निर्णय कठीण नसेल. कारण या शिवाय जगात बऱ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही प्रामाणिक असाल तर योग्य वेळ आली की योग्य तो निर्णय घेतला जातो. हा एक असा निर्णय आहे की तुम्ही तो टाळू शकत नाहीत. पण असं असलं तरी निवृत्तीसाठी बराच काळ असल्याचं त्याने पुढे सांगितलं. केएल राहुलने कसोटीत 4 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यात 11 शतकं आणि 20 अर्धशतकं ठोकली आहेत. तर वनडे 3360 धावा केल्या असून 8 शतकं आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे.
केएल राहुल म्हणाला की, “आपल्या देशात क्रिकेट सुरूच राहील. जगभर क्रिकेट सुरूच राहील. आयुष्यात आणखी महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि मला वाटते की हा नेहमीच माझा विचार राहिला आहे. पण मी वडील झाल्यापासून, जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. हाच माझा विचार आहे.”
केएल राहुल शेवटचा टी20 सामना 2022 मध्ये खेळला होता. टी20 क्रिकेटमध्ये त्याने 72 सामन्यात 2265 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश ाहे. त्यानंतर त्याला संघात काही संधी मिळाली नाही. पण आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. सध्या आयपीएलध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे. यापूर्वी त्याने पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व केलं आहे.